25 April 2024 10:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

'ते' ट्विट: सचिनला ट्रोल करणाऱ्या फिल्मी देशभक्तानी भारत-पाकिस्तान मॅचचा मनसोक्त आनंद लुटला

Sachin Tendulkar, Indian Cricket Match, Cricket World Cup 2019 Match, Pulawama Terror Attack, Twitter

लंडन : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर भ्याड दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात तब्बल ४० हुन अधिक जवान शहीद झाले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने सत्ताधारी पक्षाने समाज माध्यमांच्या आडून मोठं राजकीय भांडवल केल्याचे दिसले. देशात जर त्यानंतर नैसर्गिक देशभक्ती उफाळून आली असती तर उत्तम झालं असतं. मात्र तसं होता, पाकिस्तानला अनुसरून कोणी एखादा विषयावर मत व्यक्त केल्यास त्यांना ट्रॉलर्स’ने झोडपून काढणं म्हणजे समाज माध्यमांवरील एक कलमी कार्यक्रम झाला होता.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध अधिकच टोकाचे झाले होते. त्यात विषय आला होता तो लवकरच येऊ घातलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपचा आणि त्यावर समजा माध्यमांवरून पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेऊ नये अशा प्रतिक्रियांचा साहजिकच सुळसुळाट झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे त्यावेळी येऊ घातलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत केवळ दोन गुण मिळवण्यासाठी भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळू नये आणि पाकिस्तानवर बहिष्कार टाकावा अशा प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटू लागल्या.

मात्र त्यावेळी भारतरत्न सचिन तेंडुलकरने सदर विषयाला अनुसरून एक ट्विट केलं ज्यामध्ये म्हटलं की, ‘भारताने पाकिस्तानसोबत सामना न खेळण्यापेक्षा, सामना खेऊन पाकिस्तानला जोरदार उत्तर द्यावं अशी प्रतिक्रिया नोंदवली’. मात्र यावर संतापलेल्या फिल्मी देशभक्तांनी मागचा पुढचा विचार न करता सचिन तेंडुलकरला अत्यंत शेळक्या भाषेत झोडपून काढल्याचे आणि देशभक्तीचे डोस दिल्याचे पाहायला मिळाले आणि त्यात सत्ताधारी पक्षातील समर्थकांचा सर्वाधिक भरणा असल्याचं निदर्शनास येत होतं. मात्र काल हेच फिल्मी देशभक्त रविवारचे औचित्य साधून भारत-पाकिस्तान मधील सामन्याचा गल्लोगल्ली सोमरस पीत आनंद घेत असल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे अशा फिल्मी देशभक्तीला पहिल्यांदा सलाम करावा एवढीच प्रतिक्रिया अनेक प्रामाणिक देशभक्तांनी दिली.

नेमकं काय ट्विट केलं होतं सचिन तेंडुलकरने त्यावेळी?

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x