20 April 2024 4:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी शिक्षणाची अट रद्द, गडकरींचा निर्णय

Nitin Gadkari

नवी दिल्ली : केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची काम करण्याची प[पद्धत वेगळीच समजली जाते. देशातील महामार्ग रस्त्यांचा होत असलेला विकास पाहून गडकरींना रोडकरी असेही संबोधले जाते. महाराष्ट्रातील एक दूरदृष्टी जपणारा केंद्रातील मराठी नेता म्हणून त्यांची देशभर ओळख आहे. गडकरी यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात देखील दळणवळणमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर, अशिक्षित युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पहिलाच महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने त्याची समाज माध्यमांवर देखील जोरदार चर्चा रंगली आहे.

समाजातील अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या युवकांना इच्छा असून देखील वाहनचालक म्हणजे ड्रायवर म्हणून नोकरी उपलब्ध होत नाही. कारण, वाहनचालकाचा परवाना काढण्यासाठी सरकारने कमीत कमी इयत्ता आठवी पास असणे बंधनकारक केले होते. परंतु, नितीन गडकरी यांनी आठवी पास असण्याचा नियम आता कायमस्वरूपी शिथिल केला आहे. त्यामुळे, यापुढे अशिक्षित किंवा कमी शिकलेली व्यक्ती देखील ड्रायव्हींग लायसन्स म्हणजेच, वाहनचालक परवाना काढण्यास पात्र ठरू शकते. देशातील ट्रान्सपोर्ट क्षेत्रात सद्यस्थितीत २२ लाखांपेक्षा अधिक ड्रायव्हरांची नितांत गरज आहे. त्यामुळे, दूरदृष्टी आणि रोजगार याचा विचार करुन गडकरींच्या अधिपत्याखाली दळणवळण खात्याने हा निर्णय घेतला आहे. याबाबत, खुद्द नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सर्वांना माहिती दिली आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियमावली १९८९ या कायद्यात सुधारणा करुन हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. नितीन गडकरींच्या या निर्णयामुळे अशिक्षीत किंवा अडाणी व्यक्तीला देखील वाहनचालकाचा परवाना काढता येईल. त्यामुळे बेरोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, ड्रायव्हिंगच्या ट्रेनिंगसाठी देशात २ लाख स्कील सेंटर देखील उभारण्यात येणार आहेत.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x