25 April 2024 12:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
x

ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया ही बॅलेट पेपरपेक्षा महाग; मग ईव्हीएमचा हट्ट का?

MP Udayanraje Bhosale

सातारा : जगातील अनेक प्रगत देशांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सामान्यांच्या खिशातून टॅक्सच्या माध्यमाने जाणाऱ्या पैशांचा ईव्हीएमसाठी अपव्यय चालला आहे. एक हजार मतदानासाठी बॅलेट पेपरसाठी एक हजार ३००, तर ईव्हीएमवर मतदान घेण्यासाठी ३३ हजार रुपयांचा खर्च येतो. या निवडणुकीतच ४५०० कोटींपेक्षा जास्त खर्च ईव्हीएमवर मतदान घेण्यासाठी केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणतीही मानवनिर्मित गोष्ट बनविणाऱ्याला त्यातील त्रुटी माहित असतात, त्यामध्ये कसे बदल करायचे हे माहित असते. अगदी कायद्यात देखील किती पळवाटा आहेत असेही उदयनराजेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुढे काय व्हायचं ते होऊद्या मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देतो, सातारा लोकसभा मतदारसंघातली फेरनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर घ्यावी अशी जाहीर मागणी एनसीपीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीत अनेक मतदारसंघातल्या मतांमध्ये मोठा फरक असल्याच्या तक्रारी मोठ्याप्रमामांवर आल्या होत्या. ज्यानंतर समाज माध्यमांवर एक फेसबुक पोस्ट लिहून उदयनराजे भोसले यांनी ही जाहीर मागणी केली.

यासंदर्भात राज्यातल्या इतर उमेदवारांनी देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. दरम्यान हा भारतीय लोकशाहीचाच घात आहे, काय व्हायचं ते होऊ द्या मी खासदारकीचा राजीनामा देतो सातारा लोकसभा मतदारसंघातली निवडणूक बॅलेटपेपरवर घ्या, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्टच सार्वजनिक लिहिली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाला जर ईव्हीएम एवढी सुरक्षित व तांत्रिकदृष्ट्या सक्षम वाटत असतील तर त्यांनी झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात देशभरात जी तफावत आली त्याबाबत खुलासा केला पाहिजे अशीही मागणी उदयनराजेंनी केली आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x