25 April 2024 9:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

विधानसभा २०१९: जिंकण्या हरण्यापेक्षा काँग्रेसची मूळं नष्ट करण्याची रणनीती? सविस्तर

maharashtra assembly election 2019, NCP, Congress, Vanchit Bahujan Aghadi, Prakash Ambedkar, MIM, BJP Maharashtra

मुंबई : देशातील निवडणूक असो किंवा राज्यातील काँग्रेसचा मूळ पारंपरिक मतदार हा मुस्मिल आणि बहुजन समाज हाच राहिला आहे. मराठा आरक्षण देऊन राष्ट्रवादीला संकटात टाकलंच आहे, मात्र सध्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचं मूळंच नष्ट करण्याची शिस्तबद्ध योजना आखण्यात आली आहे. लोकसभेत भले प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला काहीच हाती लागलं नसेल, मात्र काँग्रेसला लोकसभेत भुईसपाट करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि त्यात जवळपास काँग्रेसच्या एकूण ८ मतदारसंघाचा समावेश होता. औरंगाबादची जागा जरी एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी जिंकली असली तरी त्यात बहुजन समाजाचा वाटा फार कमी असून, तिथली इतर राजकीय गणितं त्याला कारणीभूत ठरली आहेत.

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत देखील प्रकाश आंबेडकरांशी संवाद साधून त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांनी जाणूनबुजून बारामती ते नांदेडच्या जागांची मागणी करून केवळ खोडसाळपणा केला होता. सध्या देखील ते तेच करताना दिसत आहेत, कारण त्यांना जिंकण्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीला पराभूत करण्यात धन्यता वाटत आहे. त्यामुळेच काँग्रेसने त्यांना दिलेल्या प्रस्तावावर विधानसभा निवडणुकीसाठी आम्हीच काँग्रेसला ४० जागा सोडू, असा प्रस्ताव वंचितचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेसला दिला आहे. त्यातूनच ते आघाडीची उत्सुक नसून त्यांना काँग्रेसचं राज्यातून मूळ नष्ट करण्याच्या मिशनमध्ये सामील होण्यात अधिक रस आहे असंच म्हणावं लागेल.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या २४८ जागा लढवेल, अशी घोषणा पडळकर यांनी यावेळी केली. तसेच दिलेला प्रस्ताव जर काँग्रेसला मान्य असेल तर त्यांनी १० दिवसांत आमच्याशी संपर्क करावा, असंही पडळकर म्हणाले. परंतु वंचितच्या प्रस्तावावर चर्चेशिवाय निर्णय नाही, असं काँग्रेसने म्हटलं आहे. दरम्यान, लोकसभेला जशी वंचित स्वबळावर लढली तश्याच प्रकारे विधानसभेलाही वंचित स्वबळावर लढणार का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

संपूर्ण बहुजन समाज माझ्यासोबत असल्याचा देखावा करणारे प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले, तर अकोल्याच्या राजकारणात परिचित असताना सुद्धा त्यांना तिथे देखील पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे २ मतदारसंघातून निवडणूक लढवून देखील ते निवडून आले नाहीत आणि त्याला कारण म्हणजे त्यांना आलेल्या सुवर्ण राजकीय संधीची माती त्यांनी स्वतःच केली. आज पुन्हा तीच चूक ते विधानसभेत देखील करत आहेत. मात्र प्रकाश आंबेडकरांचे सर्व राजकीय निर्णय हे भाजपसाठी फलदायी ठरत असल्याने, ज्यांच्या विरोधात त्यांचं नैतृत्व पुढे आलं, त्यांनाच प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय निर्णयांचा अधिक फायदा होत असल्याने विरोधकांनी देखील वेगळाच संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे ते ‘भाजप हटावो देश बचाओ’ मिशन’मध्ये सामील आहेत कि ‘काँग्रेस मुक्त भारत मिशनमध्ये’ ते कळण्यास मार्ग नाही अशी सध्याची स्थिती आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x