20 April 2024 7:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

कामचुकार अधिकाऱ्यावर चिखलफेकीमुळे तुरुंगवास; १८ मृतदेह चिखलात मिळून देखील दोषी मोकाट

Shivsena, BJP, Tivare Dam Incident, Shivsena Contractor, Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, Minister Tanaji Sawant

चिपळूण : तीन दिवसांपूर्वी कोकणातील चिपळूण येथे झालेल्या तिवरे धरण फुटीच्या घटनेनंतर त्यात शिवसेनेतील स्थानिक आमदारच कॉन्ट्रॅक्टर असल्याचं चौकशीत बाहेर आलं होतं. तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेणाऱ्या मंत्री तानाजी सावंत यांनी स्थानिकांसोबत केलेल्या वरवरच्या चर्चेअंती सर्व दोष खेकड्यांना दिला होता आणि त्यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

चिपळूण येथील तिवरे धरण २ दिवसांपूर्वी रात्री ९ च्या सुमारास फुटलं. त्या दुर्घटनेत एका वाडीतील तब्बल २४ जण वाहून गेले. दरम्यान आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह शोधपथकाच्या हाती लागले असून नशिबाने एकजण जिवंत आढळला आहे. मात्र अनेकांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. धरण फुटल्यामुळे एकूण १३ घरं वाहून गेल्यानं अनेक कुटुंबाची मोठी आर्थिक हानी देखील झाली आहे. धरण दुरुस्तीचा प्रस्ताव केवळ लालफितीत अडकला नसता, तर हा अनुचित प्रकार टाळता आला असता. तसेच, धरणाला पडलेल्या भगदाडीच्या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली असती, तर आज १८ गावकऱ्यांचा जीव वाचला असता.

तिवरे धरण फुटीच्या अगोदरच या धरणाला भगदाड पडल्याची तक्रार चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती. तिवरे (भेदवाडी) येथील रहिवासी असलेल्या अजित चव्हाण यांनी ही लेखी तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे ११ फेब्रुवारी रोजीच ही तक्रार देण्यात आली होती. त्यावेळी, नुकतीच उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने पाण्याचा साठा आणि विसर्ग नसल्याचा देखील उल्लेख या तक्रारीत करण्यात आला होता. तसेच, आगामी काळातील पावसाळा लक्षात घेता, त्वरित या धरणाला पडलेल्या भगदाडासंदर्भात आवश्यक त्या सूचना करण्याचे देखील गावातील रहिवासी चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले होते. परंतु, नेहमीप्रमाणेच सरकारी कार्यालयाचा ढिसाळपणा अन् अधिकाऱ्यांची अनास्था या दुर्दैवी घटनेला कारणीभूत ठरली आहे.

दरम्यान आमदार नितेश राणे यांनी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामचुकार अधिकाऱ्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्यावर चिखलफेक केली होती आणि त्यानंतर त्यांना न्यायालयाच्या आदेशानंतर ९ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र त्यानंतर चिंतेचा विषय यासाठी झाला आहे की, कामचुकार अधिकाऱ्यावर चिखलफेक झाली म्हणून आमदार नितेश राणेंना ९ दिवसांची कोठडी. परंतु १८ निरपराध शव तिवरे धरणाच्या परिसरात चिखलात आढळले तरी दोषी मोकाट असून, सर्व जवाबदारी झटकून युती सरकारने खेकड्यांवर जवाबदारी झटकली आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x