26 April 2024 1:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

मुंबई पालिकेकडून बेकायदा पार्किंगवरून १०,००० दंड वसुलीला सुरुवात

BMC, Mumbai Municipal Corporation, Shivsena, Vehicle Parking, Illegal Vehicle Parking, Ten Thousand Penalty, Shivsena, Uddhav Thackeray, Aaditya Thackeray

मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर पर्यंतच्या हद्दीत अवैधरीत्या वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनांविरुद्ध आजपासून धडक दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. जी दक्षिण विभागात पहिला दंड ठोठावत पहिल्या दिवशी एकूण ५६ वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे. यापैकी एकूण ९ वाहनमालकांनी प्रत्येकी दहा हजार रुपये दंड भरून वाहने सोडवून घेतली. तर उर्वरित ४७ वाहने महापालिकेच्या ताब्यात असून ती परत देताना दंडासह विलंब शुल्क आकारले जाणार असल्याचे देखील सांगितले आहे.

महापालिकेच्या २३ सार्वजनिक वाहनतळांलगतच्या अनधिकृत पार्किंगविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले होते. या कारवाईअंतर्गत संबंधित परिसरात एखादे अवजड वाहन अनधिकृतपणे उभे असल्याचे आढळल्यास त्यावर किमान १५,००० रुपये इतका दंड आकारणी करण्यात येणार आहे. मध्यम आकाराच्या वाहनांवर रुपये ११ हजार; तर कार-जीप यासारखी वाहने अनधिकृतपणे पार्क केल्याचे आढळल्यास त्यावर १० हजार रुपये एवढी दंड आकारणी करण्यात येणार आहे.

रिक्षा, साइडकार असलेले दुचाकी वाहन इत्यादी ३ चाकींवर रुपये ८,०००, तर अनधिकृतपणे पार्क केलेल्या दुचाकी वाहनांवर किमान ५,००० रुपये एवढी दंड आकारणी करण्यात येणार आहे. सध्या २३ ठिकाणी सार्वजनिक विक्री करण्यात येणार आहे.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x