25 April 2024 7:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

नेटिझन्सकडून राऊतांचे व उद्धव ठाकरेंचे 'उत्तुंग' नेत्यांसोबतच्या भेटीचे फोटो व्हायरल

Sanjay Raut, Shivsena, Raj Thackeray, Uddhav Thackeray, MNS, Soniya Gandhi, EVM Hacking, Ballet Paper

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी अचानक यूपीए अध्यक्षा आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानं महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-एनसीपीच्या आघाडीत मनसे पक्ष सामील होणार का, याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, ही भेट शिवसेनेच्या पचनी पडली नसल्यासारखी खोचक प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

दरम्यान दिल्ली हे राजकीय घडामोडींचं केंद्रच आहे. इथे अनेकांच्या भेटीगाठी होतच असतात. कोण कुणाला कशासाठी भेटतं याची डायरी घेऊन आम्ही बसत नाही. ज्याच्या-त्याच्या पक्षाशी संबंधित हा विषय आहे’, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तळमळीने दिली आहे. दरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी ही दोन उत्तुंग व्यक्तिमत्व होती. या भेटीची तुलना त्यांच्या भेटीशी होऊच शकत नाही, असा टोलाही त्यांनी प्रतिक्रिया देताना लगावला.

दरम्यान नेटकऱ्यांनी संजय राऊत यांच्या ‘उत्तुंग’ नेत्यांबद्दलच्या वक्तव्यावरून खिल्ली उडवत, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या देशातील ‘उत्तुंग’ नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल केले आहेत. प्रसिद्ध करण्यात आलेले फोटो हे सर्वजण भाजप आणि मोदी-शहांशी छत्तीसचा आकडा असणारे नेते आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी कोणतीही प्रतिक्रिया देताच नेटिझन्स त्यांना तोंडघशी पाडतात हे नित्त्याचे झाले आहे.

काय आहेत त्या नेमक्या पोस्ट;

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x