29 March 2024 2:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार?
x

संध्याकाळी ७ ते रात्री १० दरम्यान रडल्याने वजन कमी होतं: संशोधकांचा दावा

Crying, Weight, Study and Research

नवी दिल्ली : संशोधनातून आता नवनवे दावे वैज्ञानिक करताना दिसत आहेत. आजच्या जगात वजन घटवण्यासाठी अनेकजण मोठ्याप्रमाणावर पैसा आणि शक्ती खर्च करताना दिसतात, मात्र अपेक्षित असलेला फायदा होईलच याची शास्वती कोणीही देताना दिसत नाहीत. परंतु एखाद्या संशोधनातून असा केला गेला की ज्यामुळे तुमचा नाही पैसा खर्ची पडणार, नाही तुमची शारीरिक शक्ती पणाला लागणार. परंतु नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनानुसार रडल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते. सिंगापूर, मलेशिया, हाँगकाँग या देशांमध्ये काम करणाऱ्या ‘एशिया वन’ या वेबसाइटने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासामध्ये संध्याकाळी ७ ते रात्री १० या वेळेदरम्यान रडल्यास आपल्याला वजन कमी करण्यात मदत होते, असा दावा संबंधित संशोधकांनी केला आहे.

एखादी व्यक्ती रडताना तिच्या शरीरामध्ये कोर्टिसोल संप्रेरकाची निर्मिती होते. हे संप्रेरक शरीरामधील घटकांमध्ये मिसळतात. संबधित संप्रेरकामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच तणावामध्ये रडू आल्यास शरीरातील हानीकारक घटक अश्रूंवाटे बाहेर पडतात. वजन कमी होण्यासाठी याचा मोठा फायदा होतो. या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांशी प्रसिद्ध जैवसंशोधक विल्यम फरे यांना देखील अभ्यासातून सहमती दर्शवली आहे.

परंतु एखादी व्यक्ती खोटं खोटं रडण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला या खोट्या रडण्याचा वजन कमी करण्यासाठी कोणताही फायदा होणार नाही, असं देखील या संशोधनामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. जर एखाद्या व्यक्तीने रडणे आणि त्यामागील कारण खरं असेल तरच त्याचे वजन कमी होण्यास थेट मदत होईल असं देखील संशोधकांनी म्हटलं आहे. मनुष्याचे आश्रू ३ प्रकारचे असतात असा दावा संशोधकांनी केला आहे. अत्यावश्यक आश्रू, प्रतिसाद म्हणून आलेले आश्रू आणि मानसिक कारणामुळे बाहेर आलेले आश्रू. अत्यावश्यक आश्रू म्हणजे आपल्या डोळ्यांमधील ओलावा टिकवण्यासाठी डोळ्यांना येणारे पाणी. प्रतिसाद म्हणून आलेले आश्रू म्हणजे प्रदुषण आणि धुरामुळे डोळ्यात येणारे पाणी. मानसिक आश्रू म्हणजे भावना आणि संवेदनांशी संबंधिक कारणाने डोळ्यात येणारे पाणी. तर तिसऱ्या प्रकारचे आश्रू हे अधिक तिव्र भावना व्यक्त करणारे असतात. त्यामुळेच केवळ तिसऱ्या प्रकारच्या आश्रूंमुळे वजन कमी होण्यास मदत होते असं संशोधक स्पष्ट केला आहे.

दरम्यान एखादी व्यक्ती आराम करत असताना आपल्या ह्रदयाशीसंबंधीत स्थायू साडेआठ कॅलरीज जाळतात. एखादी व्यक्ती जेव्हा रडते तेव्हा ह्रदयाचे ठोके वाढतात. हे ठोके वाढल्याने ह्रदयाशी संबंधीत स्थायूंमार्फत अधिक प्रमाणात कॅलरीज जाळल्या जातात. रडल्याने थोड्याफार प्रमाणात का असेना मात्र शरीरातील कॅलरीज जळतात. त्यात देखील संध्याकाळी ७ ते रात्री १० या वेळेदरम्यान रडल्याने वजन कमी होण्यास अधिक फायदा होतो असं देखील या संशोधनात म्हटले आहे. या कालावधीत कोर्टिसोल संप्रेरक अधिक कार्यक्षम असल्याने या काळात रडणे वजन कमी होण्यासाठी फायद्याचे असल्याचे संशोधकांनी अहवालात म्हटले आहे.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x