23 April 2024 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा EPF Money Withdrawal | पगारदारांनो! EPF खात्यातून पैसे काढल्यावरही टॅक्स भरावा लागणार, कधी आणि किती ते लक्षात ठेवा Numerology Horoscope | 23 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 23 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

कोकण: महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विधानसभेला कोकणातील सर्व जागा लढवण्याच्या तयारीत

Narayan Rane, MP Narayan Rane, MLA Nitesh Rane, Former MP Nilesh Rane

राजापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने रविवारी २८ जुलै रोजी राजापूर-लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. राजापूर नगर वाचनालय सभागृहात सकाळी १०.३० वाजता ही बैठक होणार आहे.

विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने आतापासूनच तयारी हाती घेण्यात आली आहे. या निवडणुकीची व्यूहरचना ठरविण्यासाठी राजापूर-लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या प्रमुख ३ पक्षांमध्ये रंगतदार लढाई पहायला मिळणार आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे ३ पक्ष जरी सर्व जागांवर उमेदवार देऊ शकले नाहीत तरी त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पक्ष स्थापनेनंतरच्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत स्वाभिमान पक्षाला जिल्ह्यात मिळालेली मते पाहता युती न झाल्यास शिवसेना-भारतीय जनता पक्षाला फटका बसून दोघांची लढाई अन् तिस-याचा फायदा अशी स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. त्यादृष्टीने सर्वच पक्ष आता कामाला लागले आहेत. जिल्ह्याचा विचार करता कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी असे तीन उपविभाग असून देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि दोडामार्ग असे आठ तालुके आहेत. जिल्ह्यात एकूण ७५२ महसुली गावे असून, ४३३ ग्रामपंचायती आहेत. कणकवली (२६८), कुडाळ (२६९) आणि सावंतवाडी (२७०) असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. कणकवली मतदारसंघात देवगड, वैभववाडी व कणकवली या तीन तालुक्यांचा, कुडाळ विधानसभा मतदारसंघात कुडाळ आणि मालवण तर सावंतवाडी मतदारसंघात सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या तीन तालुक्यांचा समावेश आहे.

गत निवडणुकीत म्हणजे २०१४ साली कणकवली मतदारसंघातून काँग्रेसचे नीतेश राणे, कुडाळमध्ये शिवसेनेचे वैभव नाईक आणि सावंतवाडीमध्ये शिवसेनेचे दीपक केसरकर असे तीन आमदार निवडून आले. ही निवडणूक राजकीयदृष्ट्या सिंधुदुर्गचे राजकारण पलटविणारी होती. कारण या निवडणुकीत सलग सहा वेळा निवडून आलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पहिल्यांदाच पराभव झाला होता. शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी जायंट किलरची भूमिका बजावताना राणेंचा दहा हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x