26 April 2024 4:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

विधानसभेपर्यंत राष्ट्रवादीचे उमेदवार संपवण्याची योजना? आतापर्यंत २० नेते बाहेर, तर १० तयारीत

NCP, Shivsena, BJP Maharashtra, Sharad Pawar, Ajit Pawar, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई : देशांत २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उदय झाला अन् राजकारणाचे चित्रच पालटून गेले. सर्वकाही सकारात्मक नसलं तरी अनेक पिढ्या राजकारणात असल्याने मातब्बर बनलेल्या घराण्यांना मोठे हादरे बसले. वाढवलेला व्याप कायम राखण्यासाठी या घरण्यांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला. मोठ-मोठी घराणी सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसोबत होती. त्यामुळे पक्षांतराचा सर्वाधिक फटकाही राष्ट्रवादी काँग्रेसलाच बसत असून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांची चिंता वाढली आहे.

नेत्यांची पक्षांतर करण्याची अनेक कारणे आहेत. काही नेत्यांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर अनेक नेत्यांना आपल्या शिक्षणसंस्था, सुतगिरण्या, कारखाने यांचा वाढलेला व्याप सुरक्षित ठेवायचा आहे. त्यासाठी घेतलेले कोट्यवधीचं कर्ज कारणीभूत ठरत आहे. सत्ता नसल्यामुळे बँका घरापर्यंत येत आहेत. परंतु, सत्ताधारी पक्षासोबत असल्यास ही वेळ येणार नाही, अशी प्रत्येकाची भावना आहे. त्यामुळे पक्षांतरवर नेत्यांचा भर वाढला आहे.

जसजशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तस तशी सत्ताधाऱ्यांच्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहेत. दलबदलीचा सर्वाधिक मोठा फटका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला बसत आहे. मात्र त्याचे लोन आता पक्षाचे बालेकिल्ले असलेल्या मतदारसंघात देखील पसरू लागल्याचे दिसत आहे. तसाच काहीसा प्रकार सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या बाततीत घडणार असल्याची जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे सत्र सुरु केले आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु आहेत. मात्र या मुलाखतीसाठी माढा मतदारसंघाचे आ. बबन शिंदे आणि बार्शीचे आ. दिलीप सोपल हे अनुउपस्थित आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं चर्चेने जोर पकडला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस – एनसीपी’च्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष आणि सेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे बबन शिंदे आणि दिलीप सोपल हे देखील पक्षांतर करणार असल्याची चर्चा आहे. गेले काही दिवस या दोन्ही नेत्यांनी युतीच्या नेत्यांशी चांगलीचं जवळीकता वाढवली आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत आपले बस्तान बसवणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात राजकीय वारी केली होती. या वारीत आ. बबन शिंदे यांच्या घरी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी खिचडी खाली. त्यामुळे बबन शिंदे यांची खिचडी ही पक्षांतारच्या चर्चेला पोषक ठरली.

तत्पूर्वी ठाण्यातील एनसीपीचे नेते आणि शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बरोरा यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. त्यानंतर बरोरो हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी एनसीपीला अजून किती धक्के बसणार ते पाहावं लागणार आहे.

पक्षांतराचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. राष्ट्रवादीतील २० नेत्यांनी पक्षांतर केले. यामध्ये बबनराव पाचपुते, शिवाजी कर्डिले, राहूल कूल, किसन कथोरे, कपिल पाटील, सचिन अहिर, लक्ष्मन ढोबळे, निवेदिता माने, विनय कोरे, संजय सावकारे, प्रसाद लाड, लक्ष्मण जगताप, बाबासाहेब देशमुख, नरेंद्र पाटील, प्रशांत परिचारक, सुरेश धस, विजयकुमार गावीत, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील, पांडुरंग बरोरा या नेत्यांचा समावेश आहे.

दरम्यान राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारी असलेल्या नेत्यांची यादी देखील मोठी झाली आहे. यामध्ये संग्राम जगताप, वैभव पिचड, राणाजगजितसिंह पाटील, अवधुत तटकरे, बबन शिंदे, संदीप नाईक, दिलीप सोपल, चित्रा वाघ, आणि शिवेंद्रराजे भोसले हे नेते देखील राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर पक्षाला दुसरा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजीनामा सत्र थांबायचं नाव घेत नाही आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड हे देखील भाजपमध्ये येत्या ३० जुलैला प्रवेश करणार आहेत. शुक्रवारी त्यांनी अकोला येथे मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. नुकतीच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर वैभव पिचड भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र, आता त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x