28 March 2024 8:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

उद्योगपतींवर आत्महत्येची वेळ; हे 'मेड इन इंडिया' की 'डेड इन इंडिया'? - धनंजय मुंडे

Dhananjay Munde, Opposition leader Dhananjay Munde, NCP, Sharad Pawar, CCD, Cafe Coffee Day, siddharths suicide case

मुंबई : मागील २ दिवस बेपत्ता असलेले ‘सीसीडी’चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. सिद्धार्थ यांनी मंगळुरु येथील नेत्रावती नदीत आत्महत्या केली असल्याचं सांगितलं आहे. आज नदीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. यावरून आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच सिद्धार्थ यांनी एक पत्र देखील लिहिले होते.

व्ही. जी सिद्धार्थ कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांचे जावई आणि प्रसिद्ध कॅफे चेन कॅफे कॉफी डे चे मालक आहेत. सिद्धार्थ हे सोमवारी आपल्या कारने प्रवास करत होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले. मंगळुरू येथील नेत्रावती नदीच्या परिसरात ते असल्याची माहिती मिळाली होती. कर्नाटक पोलिसांनी नदी आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. अखेर ३६ तासांनंतर त्यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला.

सीसीडी चे सर्वेसर्वा व्ही.जी. सिद्धार्थ यांच्या आत्महत्येचे वृत वेदनादायक आहे. सिद्धार्थ यांनी स्वदेशात मोठा व्यवसाय उभारला. ३० हजार रोजगार उपलब्ध करून दिले. देशातील तरुण उद्योजकांनी आत्महत्या करणे दुर्दैवी आहे. सरकारच्या धोरणाला काय म्हणावे मेड इन इंडिया की डेड इन इंडिया?” असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, नोटबंदीनंतर अनेक उद्योग संपुष्टात आले तर अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याचे आरोप विरोधकांनी अनेकवेळा केला होता. अशा आर्थिक गर्तेत अडकलेल्या मोठ्या उद्योगांचे हे एक उदाहरणच म्हणावे लागेल, कारण अशा घटना यापुढे देखील पाहायला मिळतील अशी शंका अनेकांनी व्यक्त केली आहे.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x