16 April 2024 11:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | एका वर्षात 113% परतावा देणारा 12 रुपयाचा शेअर कोसळणार? तज्ज्ञांचा इशारा काय? Adani Power Share Price | अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा दबावाखाली? शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, हे टॉप 3 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत पैसा वाढेल Suzlon Share Price | 1 वर्षात 416% परतावा देणारा शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Quant Mutual Fund | पगारदारांनो! महिना 1100 रुपयांची SIP बचत देईल 20 लाख रुपये, खास योजना सेव्ह करा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना 5,000 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर देईल रु. 3,56,829 देईल Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

इस्रोने शेअर केली चंद्रयान-२ द्वारे काढलेली पृथ्वीची पहिली छायाचित्रे

Chandrayan 2, Earth

मुंबई : २२ जुलै २०१९ रोजी चंद्रयान-२ आपल्या मोहिमेवर रवाना झाल्यानंतर काही दिवसातच सोशल मीडियावर काही खोटी छायाचित्रे वायरल होणे सुरु झाले होते. हि छायाचित्रे चंद्रयान-२ द्वारे काढण्यात आल्याचा दावा केला जात होता. पण आता इस्रोनेच चंद्रयान-२ द्वारे काढलेली पृथ्वीची पहिली छयाचित्रे ट्विटरवरून लोकांपर्यंत पोहोचवली आहेत. चंद्रयान-२ च्या विक्रम लँडरच्या एलआय ४ कॅमेराद्वारे हि छायाचित्रे काढण्यात आली आहेत.

जुलैच्या अखेरीस चंद्रयान-२ योग्य वाटचालीकडे जात असल्याचे इस्रोच्या बंगळुरू मुख्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. इस्रो सध्या चंद्राच्या दक्षिण द्रव प्रदेशात लँडर (अवकाशयान) च्या लँडिंगसाठी लक्ष केंद्रित करत आहे. जिथे कोटही देश अद्याप गेलेला नाही. देशातील महत्वकांक्षी कमी किमतीच्या अंतराळ कार्यक्रमासाठी एक मोठी झेप, सर्वात शक्तिशाली तीन चरण रॉकेट जीएसएलव्ही-एमकेआयआयआय-एम १ ने २२ जुलै २०१९ ऐवजी आंध्रप्रदेश श्रीहरीकोटा येथील स्पॉसपोर्ट येथून पृथ्वीच्या कक्षेत अंतराळ यान सोडले होते. ते हळूहळू आता आपले टप्पे पार करत आपली कामगिरी छायाचित्रांच्यामार्फत भारतापर्यंत पोहोचवत आहे.

नुकतेच चंद्रयान-२ ने तिसरी पृथ्वी कक्षा वाढवण्याचे कौशल्य यशस्वीरित्या पार पाडले आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात रोव्हर सॉफ्ट लँडिंगचे नियोजन करून चंद्रयान-२ येत्या आठवड्यात चंद्राच्या परिसरापर्यंत नेण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय.

हॅशटॅग्स

#Technology(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x