19 April 2024 11:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत महिना SIP करा, हमखास 12 लाख रुपये परतावा मिळेल BYD Atto 3 | खुशखबर! आता BYD Atto 3 ई-कारला नो वेटिंग, झटपट डिलिव्हरी मिळणार, प्राईससह फीचर्स जाणून घ्या ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार?
x

अभिनंदनाची एकही संधी न सोडणारा मोदी भक्त अक्षय कुमार कलम ३७० वरून शांत?

Akshay Kumar, Modi Bhakt, Bollywood, PM Narendra Modi

नवी दिल्ली : काल जम्मू काश्मीरचं विभाजन आणि कलम ३७० हटवल्याचा प्रस्ताव राज्यसभेत पारित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे खासदार गुमान सिंह यांनी सोमवारी नरेंद्र मोदींचा युगपुरुष असा उल्लेख करत ही मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीचे खासदार यांनी सोमवारी नरेंद्र मोदींचा युगपुरुष असा उल्लेख करत ही मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, काश्मीरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कोट्यावधी भारतीयांना आनंद झाला आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न दिला पाहिजे अशी मागणी सभागृहाच्या शुन्य प्रहारात करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे आणखी एक शिवाजी महाराज आहेत अशा शब्दात मोदींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. कलम ३७० हटवणं हा एक धाडसी निर्णय आहे. या निर्णयामुळे भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली आहे असं त्यांनी सांगितले. यावेळी भाजप खासदार विजय गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे आणखी एक शिवाजी महाराज आहेत. ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी वाईट शक्तींविरोधात लढाई केली होती. तसेच दहशतवाद आणि भ्रष्टाचाराविरुद्ध नरेंद्र मोदींची लढाई निरंतर आहे असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, मोदींचा सर्वात मोठा चाहता असणारा अभिनेता अक्षय कुमार समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असतो आणि त्यात विषय जर मोदींशी संबंधित असेल तर अभिनंदन करणारा पहिला कलाकार देखील तोच असतो. मात्र जम्मू काश्मीर संबंधित बातमीनंतर अक्षय कुमार समाज माध्यमांवर आलाच नसल्याचं दिसत आहे. वास्तविक बॉलिवूड’च्या कलाकारांचा भारतानंतर सर्वाधिक चाहता वर्ग हा पाकिस्तानमध्ये आहे. अधिकृतरीत्या आणि अनधिकृतरित्या भारताची बॉलिवूडची मोठी बाजारपेठ पाकिस्तानशी जोडलेली आहे. विषय एवढ्यावरच नसून, २०१४ मध्ये मोदी सत्तेत येण्यापूर्वी पेट्रोलचे भाव वाढल्यावर ट्विट करणारा अक्षय कुमारला सध्या देशाची अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर कोसळली तरी काहीच कल्पना नसते हे विशेष म्हणावे लागेल. अजून पर्यंत तरी त्याची शेवटची पोस्ट ही इतर विषयांवर असल्याची दिसते.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x