25 April 2024 12:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
x

सांगली: पूरग्रस्त दुर्गम भागात मनसेकडून औषधांचा पुरवठा

Sangali Flood, Kolhapur Flood, Flood, MNS, Maharashtra Navnirman Sena, Raj Thackeray

मुंबई : निसर्गही किती विचित्र आहे, एका बाजूला मराठवाड्यात सुका दुष्काळ पडला असतानाच कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक व कोकणाला निर्दयीपणाने पावसाने झोडपून काढले. इतके की, अनेक वर्षांनी महापूर आला. भयावह पूरसदृश परिस्थिती महाराष्ट्रात १ ऑगस्टपासून निर्माण व्हायला सुरुवात झाली, पण इतकी भयानक परिस्थिती निर्माण होईल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. शहरांना जोडणारे अनेक महामार्ग तसेच गावाकडे जाणारे छोटेछोटे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले, त्यामुळे दररोज या रस्त्यावर धावणारी लोकवाहिनीही ठप्प झाली.

राज्यात आलेल्या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ कोल्हापूर, सांगली भागात सुरू आहे. अशा वेळी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यापर्यंतच्या लोकांना मदत मिळावी यासाठी राजकीय पक्षदेखील प्रयत्नशील आहेत. मनसेनेही पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला असून कोणीही न पोचलेल्या अशा सांगली जिल्ह्यातील शिये गाव, नागदेववाडी, माळवाडी, आंबेवाडी, चिखली, जयसिंगपूर येथील शिरोळ, नृहसिंगवाडी येथील गावात मनसेने मदत पोहोचवली आहे. तेथील ग्रामस्थांची चौकशी करत मनसेतर्फे सहाय्य करण्यात आले असून सांगली येथील औषधाच्या मागणीप्रमाणे त्यांना पुरवठा करण्यात आला आहे.

साधारण ५००० लीटर पाणी, ५००० फेस मास्क, ३५०० ORS रेडीमिक्स ड्रिंक, ५००० सेनेटरी नॅपकिन्स, ५०० बेबी डायपर पॅंन्टस, बॅबी फूड(मिल्क पावडर,सेरेलॅक इत्यादी), ५००० हजार व्यक्तिंना उपयोगी पडतील इतके अँटीबायोटिक औषधे, ओआरएस आणि बालरूग्णांसाठी पॅरासिटेमॉल सिरप, पोटभर मिळेल त्यावर काही दिवस पुरेल इतकी रसद आणि इतर जीवनावश्यक वस्तू या ग्रामस्थांना मनसेकडून पुरवण्यात आल्या आहे.

दरम्यान, मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पश्चिम उपनगरातील पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने पूरग्रस्त महिलांसाठी आवश्यक वस्तू विकत घेतल्या आहेत. यामध्ये साड्या, गाऊन, पेटिकोट, अंतर्वस्त्रे आणि सॅनिटरी नॅपकिन्स यांचा समावेश आहे”. लोकांकडून मदत घेतली जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

“पूरग्रस्त भागातील महिलांना मासिक पाळीच्या दिवसांसाठी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होत नसल्याचं समाजमाध्यमांतून अनेकांनी सांगितलं आहे. म्हणूनच आम्ही पूरग्रस्त गावांमध्ये सॅनिटरी नॅपकिनसुद्धा पाठवत आहोत. नागरिकांनीही सॅनिटरी नॅपकिनची पाकिटं आमच्यापर्यंत पोहोचवावीत”, असं आवाहन शालिनी ठाकरे यांनी केलं आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x