17 April 2024 5:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 17 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
x

डॉ. बाबासाहेबांचे विचार संपविण्यासाठीच भाजप वंचितला चालवत आहेत: जोगेंद्र कवाडे

Prakash Ambedkar, VBA, Vanchit Bahujan Aghadi, Prakash Ambedkar, Jogendra Kawade

बुलढाणा : पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘रिपब्लिकन’ हा राजकीय विचार संपविण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांकडून होत आहे असं कवाडे म्हणाले आहेत. तसेच त्यांनी वंचित बहुजन आघाडीवरही जोरदार टीका केली.

बुलढाणा येथील पत्रकार परिषदेत बोलताना कवाडे यांनी ‘आंबेडकरांनी वंचित आघाडी तयार केली मात्र त्यात रिपाइला कुठेच स्थान नसल्याचही त्यांनी सांगितलं. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला. त्यांना जर रिपाइचे विचार वाढवायचे असते तर त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या समोर उमेदवार उभा केला नसता असंही कवाडे म्हणाले.

पुढे बोलताना ‘भाजपचं वंचितला चालवित असल्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या आम्ही महाआघाडीचा घटक आहोत, त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर जागा वाटपाची चर्चा झाली आहे. मात्र आमचा सन्मान केला गेला नाही, तर मात्र आम्ही स्वबळावर राज्यात ५१ जागा लढवू’ असंही कवाडे म्हणाले.

तत्पूर्वी, ठाण्यात मंगळवारी एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे हेदेखील उपस्थित होते. प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडी सुरू केली असली तरी त्यात रिपाइंला कुठेच स्थान नसल्याचेही त्यांनी सांगितले. याचा प्रतत्य लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला. त्यांना जर रिपाइंचे विचार वाढवायचे असते तर त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर उमेदवार उभा केला नसता असाही आरोप त्यांनी यावेळी केला. एकूणच भाजपवाली मंडळीच या वंचितला चालवित असल्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीची कपबशी गायब करून गॅस सिलिंडर हे चिन्ह दिले आहे. वंचित आघाडीनही २८८ जागा लढविण्याची तयारी केली आहे. त्यांना आता मतदारांंपर्यंत पुन्हा नवे चिन्ह पोहोचविण्याची कसरत करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने कपबशी हे चिन्ह आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला दिले आहे. त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांना आता ‘सिलिंडर’ घरोघरी पोहोचविण्यासाठी कसरत करावी लागेल. वंचितच्या सर्व उमेदवारांसाठी हे एकच चिन्ह असेल.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x