29 March 2024 1:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

७० वर्षात पहिल्यांदा आणि मोदींच्या राजवटीत रोजगारावर नव्हे तर बेरोजगारीवर जाहिराती

Unemployment, Job Loss, Social Media

मुंबई : देशातील काही प्रसार माध्यमं जरी सरकारच्या ‘दरबारी’ बातम्या छापत असली देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक अवस्थेत असल्याचं समोर येत आहे. रोज एखाद्या अमुक क्षेत्रातील मंदीची बातमी प्रसिद्ध होतं आहेत. त्यात आता काही ऐतिहासिक विषयांची भर पडताना दिसत आहे. कारण आतापर्यंत रोजगाराच्या संबंधित जाहिराती वर्तमानपत्रात येणं तसं नवीन नाही. मात्र आता मोदींच्या राजवटीत थेट बेरोजगारीच्या जाहिराती झळकण्यास सुरुवात झाली आहे.

कारण टेक्सटाइल इंडस्ट्रीला बेरोजगारीसंबंधित जाहिरात प्रसिद्ध करण्याची वेळ आली आहे. टेक्सटाइल मिल संघाने इंडियन एक्सप्रेसच्या तिसऱ्या पानावर बेरोजगारीसंबंधित जाहिरात छापली आहे. त्या जाहिरातीनुसार, भारतीय स्पीनिंग उद्योग मोठ्या संकटातून जातं आहे. त्यामुळे या क्षेत्रातील रोजगार वेगाने घटत आहे. त्यात नोकरी गेल्यानंतर फॅक्टरीच्या बाहेर पडणाऱ्या नोकरदारांचे फोटो देखील छापण्यात आले आहेत. त्यात लिहिल्या माहितीनुसार सध्या एक तृतीअंश मिल बंद झाल्या आहेत आणि ज्या अजून सुरु आहेत त्या प्रचंड तोट्यात चालत आहेत. सध्या त्या सुरु असलेल्या मिल कडे कापूस खरेदी करण्याची क्षमता देखील शिल्लक नाही. भविष्यात लागवड करण्यात येणाऱ्या कापसाला खरेदीदार देखील नसणार आहे. विशेष म्हणजे देशभरात सध्या ८० हजार कोटींच्या घरात कापसाचं पीक घेतलं जाणार आहे, मात्र त्याला खरेदीदार नसल्याने संबंधित कापूस उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी फरिदाबाद टेक्सटाइल एसोसिएशनचे अनिल जैन यांनी माहिती दिली की, टेक्सटाइल क्षेत्रात २५ ते ५० लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. आमच्या टेक्सटाइल एसोसिएशनला देखील यावर विश्वास ठेवणं कठीण होतं आहे. धाग्याच्या मिल देखील १ ते २ दिवस बंद ठेवाव्या लागत आहेत. तर धाग्याची निर्यात तब्बल ३३ टक्क्याने खाली घसरली आहे. त्यामुळे या आलेल्या आणि भविष्यत येऊ घातलेल्या भयानक स्थितीसंबंधित जाहिरात देणं भाग पडलं आहे.

दरम्यान, मोदी सरकारने २०१६ मध्ये मोठ्या जोशमध्ये ६ हजार करोडच पॅकेज आणि अन्य फायदे देण्याची घोषणा केली होती. मोदींनी केलेल्या दाव्याप्रमाणे त्यातून १ करोड रोजगार निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र त्याउलट असलेल्या नोकऱ्याच गमावण्याची वेळ या क्षेत्रावर आली आहे. मोदींच्या घोषणेनंतर मोठं मोठ्या बातम्या छापल्या गेल्या आणि मोदींची स्तुती करण्यात आली. वास्तविक शेतीच्या व्यवसायानंतर सर्वाधिक रोजगार टेक्सटाइल क्षेत्रात मिळतो. मात्र या क्षेत्राची स्थिती इतकी भयंकर झाली आहे की आमच्या संघटनेलाच ते जाहिरात देऊन सामान्य लोकांना सांगावं लागलं आहे असं फरिदाबाद टेक्सटाइल एसोसिएशनचे अनिल जैन म्हणाले.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x