19 April 2024 7:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

भाजपचं सेनेविरुद्ध षढयंत्र; १२३ मतदारसंघ वगळता उर्वरित १६५ जागांवर उमेदवारांची यादी तयार

Shivsena, BJP Maharashtra, Assembly Election 2019, Yuti, BJP Shivsena Alliance

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात शिवसेनेला जेमतेम १०० ते ११५ जागा देऊन इतर जागा भारतीय जनता पक्षाने आणि मित्रपक्षांच्या पदरात अलगद पडतील अशी रणनिती तर भाजपने आखली आहेच. शिवाय एवढ्या कमी जागा घ्यायला शिवसेना तयार न झाल्यास विधानसभेच्या सर्व जागा शिवसेनेशिवाय लढविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मित्रपक्षांशी बोलणीही सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मित्रपक्षांना खूष करण्यासाठी त्यांना द्यावयाच्या काही जागांमध्ये ग्रामीण भागांबरोबरच मुंबईतील जागांचाही समावेश असल्याचे कळते.

लोकसभा निवडणुकांच्या वेळी विधानसभा निवडणुकीत निम्म्या-निम्म्या जागा वाटून घेण्याबाबतचे सूत्र ठरले असून शिवसेनेने हाच विषय लावून धरला आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आणखी एक तोडगा काढला आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या १२२ आणि शिवसेनेने जिंकलेल्या ६३ जागा अशा १८५ जागा वगळून उरलेल्या जागांपैकी निम्म्या-निम्म्या जागा वाटून घेण्याचा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेला देण्यात आल्याचे कळते. भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असलेले वातावरण पाहता ५ ते १० जागा कमी घ्यायला शिवसेनेमधून फारसा विरोध होणार नसला तरी १०० ते ११५ जागा घेण्याबाबत मात्र शिवसेना नेतृत्व उत्सूक नसल्याचे कळते.

शिवसेनेसोबत गेल्या विधानसभेसारखी युती तोडायचीच वेळ आली तर राज्यातील सर्वच्या सर्व २८८ जागा मित्रपक्षांसोबत लढण्याबाबतची तयारीही भारतीय जनता पक्षाने पडद्यामागून सुरू केली आहे. त्यादृष्टीने त्यांनी मित्रपक्षांशी बोलणीही सुरू केल्याचे कळते. मागच्या विधानसभेला ६ जागा लढविणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाने यावेळी ५७ जागांची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रीय समाज पक्ष जाहीररित्या एवढ्या जागांची मागणी करणार नसल्याचे मत शिवसेनेतील एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले. याशिवाय शिवसंग्रामच्या विनायक मेटे यांनीही मागच्यापेक्षा दुपटीने जागा मागितल्याचे कळते. विशेष म्हणजे या जागांबाबत भाजपच्या नेत्यांकडूनही चर्चा होत असल्याचे खात्रिलायक वृत्त आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, युतीच्या जागावाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रत्येकी दोन बैठका झाल्या आहेत. दोन्ही बैठका वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या असून त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. विद्यमान ६३ आमदारांसह आणखी तेवढ्याच, साधारणपणे १२० ते १२५ जागा शिवसेनेच्या वाट्याला येतील. १६३ ते १६८ जागा भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांना मिळतील. तर भारतीय जनता पक्ष विद्यमान १२२ आमदारांसह मित्रपक्षांसाठी १६३ ते १६८ जागांसाठी आग्रही आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे २५ ते ३० विद्यमान आमदारांना वगळणार असून नवीन चेहऱ्यांना (इनकमिंग) संधी देणार असल्याचे समजते.

दुसऱ्या बाजूला शिवसेना कोणत्याही परिस्थितीत वेगळे लढण्याच्या मानसिकतेत नाही. तसा विचार झालाच तर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडेल अथवा शिवसेनेचे काही आमदार भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर उभे राहतील, अशी भीती शिवसेनेच्या नेत्यांना आहे. मध्यंतरी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘‘आपल्याकडे कोणत्याही ८० जागा द्या, मी त्या निवडून आणतो, नाही आणल्या तर मला मंत्रीपद देऊ नका’’ असे आव्हान जाहीरपणे स्वीकारले आहे. त्यावर ‘आमच्या दोन जागा जास्ती घ्या, पण आम्हाला तुमचे गिरीश महाजन द्या’, असे उद्धव ठाकरे यांनी उपरोधिकपणे म्हटले होते.

भारतीय जनता पक्षाने आता स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी चालविली असून राज्यातील सर्वच २८८ मतदारसंघात संभाव्य उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात मंगळवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात अशा प्रकारे मुलाखती होणार आहेत.

युती होणार की नाही हे अद्याप स्पष्ट होत नसले तरी ऐनवेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात येऊन शकतो, त्यामुळे ऐनवेळी धावपळ होऊन नये तसेच गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या १२३ मतदारसंघ वगळता उर्वरित १६५ मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम चालू झाले आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एका वरिष्ठ नेत्याची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन सर्वच मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x