25 April 2024 10:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

नोटाबंदी, जीएसटी या मानव निर्मित संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला: डॉ.मनमोहन सिंग

Former PM dr manmohan singh, PM Narendra Modi, economic slowdown, GST, Demonetization

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देशाच्या जीडीपी दरात झालेल्या घसरणीबद्दल मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मानव निर्मित संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. या सर्व परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार आहे, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली. भारतातल्या आर्थिक क्षेत्रात आलेल्या मरगळीसाठी त्यांनी मोदी सरकारला जबाबदार ठरवले आहे. ही आर्थिक मंदी मानवनिर्मित असून ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.

मोदी सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या दरीत ढकलली गेली असल्याचा आरोपही यावेळी सिंह यांनी केला. तसेच नोटाबंदी आणि जीएसटीच्या नियमांमुळे देशात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मागील तिमाहीचा विचार केला तर विकासदर ५ टक्‍क्‍यांवर येवून पोहचला होता जो भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत चिंतेचे वातावरण असल्याचेही सिंह यांनी म्हटले. तसेच उत्पादक क्षेत्राचा विकास हा केवळ ०.६ एवढाच राहिला आहे. तसेच घरगुती वस्तुंच्या मागणीमध्ये निराशा असून विक्रीतील वृद्धी ही मागच्या १८ महिन्यांतील सर्वांत खालच्या स्तरावर गेली असल्याचीही माहिती सिंह यांनी यावेळी दिली. तसेच अर्थव्यवस्थेची ही परिस्थिती पाहुण गुंतवणूकदारांमध्ये निराशा निर्माण झाली आहे आणि हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या उंबरठ्यावर आर्थिक मंदी येऊन ठेपलेली असताना देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत आहे. मागील तिमाहीतील विकासदर (जीडीपी) 5 टक्क्यांवर आला आहे. हे आपण मंदीकडे जात असल्याचे निदर्शक आहेत. विकास करण्याची प्रचंड क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत असताना मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हे आर्थिक आरिष्ट ओढवले आहे, असे मत सिंग यांनी व्यक्त केले.

लोकांचे रोजगार जाण्याचं प्रमाण वाढत असल्याचं सांगत वाहन क्षेत्रात ३ लाख ५० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्याचसोबत असंघटित क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार जाण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे असा आरोप डॉ. मनमोहन सिंग यांनी केला आहे. तसेच ग्रामीण भागातील भारताची स्थिती विदारक आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे योग्य दर मिळत नाही. उत्पन्नात वारंवार घट होत असल्याचं पाहायला मिळालं आहे असं मनमोहन सिंग यांनी सांगितले.

दरम्यान आरबीआयकडून घेतलेले १ लाख ७६ हजार कोटी रुपये केंद्र सरकार कोणत्या योजनांसाठी वापर करणार आहे, याचं उत्तर नरेंद्र मोदींकडे नाही. निर्यातीचा दर घटल्याने जागतिक बाजारात उपलब्ध झालेल्या संधीचा देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी फायदा करुन घेता आला नाही. सरकारची विश्वासार्हता कमी होत चालली असल्याचा दावा डॉ. मनमोहन सिंग यांनी केला आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x