20 April 2024 9:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

कुस्तीपटू विनेश फोगट २०२० टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र

Tokyo Olympics, India, Vinesh Phogat, Wrestling

नुर सुल्‍तान: भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटनं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रँटचा पराभव करत टोकियोमध्यो होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी आपले स्थान पक्के केले आहे. अशी कामगिरी करणारी विनेश फोगट पहिली कुस्तीपटू बनली आहे. ५३ किलो वजनी गटात विनेशनं ही कामगिरी केली आहे.

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत विनेशनं दुसऱ्या सामन्यात अमेरिकेच्या साराला ८-२नं पराभूत करत कांस्य पदाकासाठी क्वालिफाय झाली आहे. दरम्यान विनेशला कांस्यपदकासाठी ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीशी सामना करायचा आहे. त्यामुळं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आपले पहिले पदक मिळवण्यासाठी विनेश केवळ एक पाऊल दूर आहे. विनेशनं पराभव केलेली सारा ही गतवर्षी ५३ किलो वजनी गटात तिनं रौप्य पदक जिंकले होते. या स्पर्धेत विनेश ५० आणि ५३ किलो वजनी गटात सहभागी झाली आहे.

पहिल्या रेपिचाज राऊंडमध्ये विनेशने युक्रेनच्या युलियावर ५-० ने मात केली होती. दुसरीकडे भारताच्या सीमा बिसलानेही पहिल्या फेऱ्यांमध्ये आश्वासक खेळ केला. मात्र मोक्याच्या क्षणी सीमा दुसऱ्या फेरीत पराभूत झाली. याव्यतिरीक्त भारताची पुजा धांडाही या स्पर्धेत ५९ किलो वजनी गटात आपलं ऑलिम्पिक स्थान पक्क करण्यासाठी उतरली आहे.

विनेशनं २०१४ आणि २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत अनुक्रमे ४८ व ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. शिवाय २०१४च्या आशियाई स्पर्धेत तिनं ४८ किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली होती. मात्र, २०१८साली जकार्ता येथे झालेल्या सामन्यात तिने सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. त्याशिवाय तिच्या नावावर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तीन रौप्य व तीन कांस्यपदक आहेत.

हॅशटॅग्स

#Sports(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x