18 April 2024 1:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Guru Rashi Parivartan | गुरु राशी परिवर्तन 'या' 3 राशींसाठी वरदान ठरणार, तुमची नशीबवान राशी आहे यामध्ये? Hyundai Exter Price | लोकांची आवडती SUV बुकिंगसाठी गर्दी, सर्व व्हेरियंटसह वेटिंग पीरियड आणि प्राईस नोट करा EPF Withdrawal Online | नोकरदारांसाठी खुशखबर! EPFO ने पैसे काढण्याचे नियम बदलले, आता दुप्पट पैसे काढू शकता Nippon India Mutual Fund | पगारदारांनो! या म्युच्युअल फंड योजना 46 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, येथे पैसा वाढवा SBI Special Scheme | टेन्शन नको! सरकारी SBI बँकेची ही योजना दरमहा पैसे देईल, इतर फायदे सुद्धा मिळतील Numerology Horoscope | 18 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 18 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

राज ठाकरेंची मनसे नेत्यांसोबत राजगडवर बैठक; त्यानंतर विभागाध्यक्षांशी; लवकरच निर्णय जाहीर होणार?

MNS, Maharashtra navnirman Sena, Raj Thackeray, vidhansabha Election 2019, Maharashtra assembly election 2019

मुंबई: निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक तारखांची घोषणा करणार आहे. निवडणूक तोंडावर असतानाच राज ठाकरे यांची मनसे मात्र ही निवडणूक लढवायची की नाही, याच संभ्रमात आहेत. मात्र आज बोलावण्यात आलेल्या बैठकीत मनसेचे पदाधिकारी निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे.

दोन दिवसांपूर्वी आलेल्या माहितीनुसार मनसे विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहेत. यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसे नेत्यांना उमेदवारांची यादी तयार करण्याचे आदेश दिले होते. विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची बैठकही घेतली होती. यामध्ये निवडणूक लढवावी अथवा नाही यावर पक्षातील नेत्यांची मतं राज ठाकरेंनी जाणून घेतली. यावेळी जर मनसे निवडणूक लढणार नसेल तर इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते पक्षापासून दूरावण्याची शक्यता वर्तविली होती.

निवडणूक जवळ आल्याने आघाडी आणि युतीच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शांत असल्याचं दिसत होतं. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी मनसेच्या विभागप्रमुखांची बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत. मनसे काही जागांवर आपले उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. आज सकाळी मनसेचे कार्यालय राजगड येथे राज ठाकरेंनी नेते आणि सरचिटणीस यांची बैठक बोलवली होती.

आज होणाऱ्या मनसे विभाग अध्यक्षांच्या बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची चर्चा करणार आहेत. मनसे विधानसभेला किती जागा लढविणार? इच्छुक उमेदवारांच्या यादीची चाचपणी करण्याचं काम सुरु आहे. मनसे नेत्यांना उमेदवारांची यादी बनविण्याचे आदेश दिले होते मात्र राज ठाकरेंनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे या बैठकीनंतर राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x