28 March 2024 7:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

कॉर्पोरेट टॅक्स घटवणार; शेअर बाजारात १६०० अंकांनी उसळी

BSE, NSE, Stock Market, Sensex, Market, Money Market, MCX

पणजी: गोवा येथे होत असलेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योग जगताला मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. कंपन्या आणि व्यावसायिकांना दिलासा देताना कॉर्पोरेट टॅक्स घटवण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. कॉर्पोरेट टॅक्स घटवण्यासाठीचा अध्यादेश पारित झालेला आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी यावेळी दिली.

निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट सेक्टरला दिलासा देणारी घोषणा केली. कंपनी करात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या या निर्णयाचं शेअर बाजाराकडूनही स्वागत करण्यात आलं. या नंतर शेअर बाजाराचा निर्देशांक १५०० अंकांनी उसळल्याचा पहायला मिळाला. उद्योग क्षेत्राला उभारणी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

कपातीनंतर कोणतीही सूट न घेणाऱ्या देशातील कंपन्या आणि देशातील नव्या उत्पादन कंपन्यांना आता २५.१७ टक्के कर द्यावा लागणार आहे. तसंच याव्यतिरिक्त कंपन्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही. तरच देशातील कंपन्यांवार लागणारा MAT देखील न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर कॅपिटल गेनवर लागणारा सरचार्जही आता आकारण्यात येणार नाही.

केंद्र सरकारने केलेल्या प्रमुख घोषणा:
१ ऑक्टोबर २०१९ नंतर स्थापन झालेल्या कंपन्यांसाठी अधिभार आणि सेस धरून कॉर्पोरेट टॅक्स १७.०१ टक्के इतका असेल.
मिनिमम अल्टरनेट टॅक्स (एमएटी) १८.५ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर
कॉर्पोरेट कंपन्यांसाठी १.४५ लाख कोटींचे आर्थिक पॅकेज
फॉरेन पोर्टफोलिओ गुंतवणुकीवरील कॅपिटल गेन्स टॅक्स रद्द

हॅशटॅग्स

#Nirmala Sitharaman(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x