25 April 2024 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
x

शिखर बँकेत भाजपचे संचालक आहेत हे भाजपने जनतेपासून का लपवलं: अजित पवार

Shikhar Bank, Maharashtra Co Operative Bank, Ajit Pawar, Sharad Pawar

मुंबई: राज्य सहकारी बँके प्रकरणांत शरद पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे नाव नाहक गोवण्यात आले. महत्वाच्या पदांवर शरद पवारांमुळे मी पोहचलो होतो. माझ्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पाहून अस्वस्थ झालो. त्यातून राजीनामा दिला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवार भावूक झाले.

शुक्रवारी मी अचानक राजीनामा दिला, त्यातून आमचे पक्षप्रमुख, नेते, कार्यकर्ते यांना सगळ्यांनाच वेदना झाल्या. त्यांना समजलंच नाही की मी राजीनामा का दिला? आता मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो जेव्हा अशी काही वेळ आली तर समजा मी पक्षातल्या लोकांशी बोललो असतो तर त्यांनी मला राजीनामा देऊ नका असंच सांगितलं असतं. ज्यांना मी न सांगता हे केलं त्यांची मी माफी मागतो असं अजित पवार यांनी सांगितलं. मी हरिभाऊ बागडेंना तीन दिवसांपूर्वी एक फोन केला होता आणि त्यांना विचारलं होतं की तुम्ही मुंबईत कधी असणार आहात? आम्ही सगळे शिखर बँकेत संचालक म्हणून काम करत होतो. आता निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे माझ्या राजीनाम्यामुळे ज्यांना वेदना झाल्या त्यांची सगळ्यांची मी माफी मागतो.

शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आज पवार कुटुंबीयांची भेट झाली. या भेटीला सुप्रिया सुळे, अजित पवार, शरद पवार आणि इतर पवार कुटुंबीयांनी उपस्थिती दर्शवली होती. तब्बल दीड तास पवार कुटुंबीयाची चर्चा सुरू होती. त्यानंतर अजित पवारांनी बाहेर येताच माझी भूमिका धनंजय मुंडे स्पष्ट करतील, असे सांगूत ते निघून गेले. तर दुसरीकडे, आमच्या कुटुंबात आईपासून एक पद्धत आहे. सर्व कुटुंबीय मिळून चर्चा करतात. ती चर्चा फक्त राजकीय होती असे नाही, काही कौटुंबिक चर्चाही होत असतात. चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही, अजित पवार पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करतील. सहकाऱ्यांशी बोलून ते अंतिम निर्णय घेतील, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर, अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्यावर मौन सोडले आहे.

दरम्यान, अजित पवारांनी काही रास्त प्रश्न उपस्थित केले आणि न पटणारी आकडेवारी देखील प्रसार माध्यमांच्या समोर उपस्थित केली. तसेच शिखर बँकेच्या प्रकरणी केवळ पवार कुटुंबियांना लक्ष करण्यात आलं असून भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या पक्षातील संचालक देखील संस्थापक मंडळावर असल्याचं महाराष्ट्राच्या जनतेपासून का लपवलं असा प्रश्न उपस्थित करून भाजपाची हवाच काढून टाकली आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x