19 April 2024 5:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या
x

विधानसभा निवडणूक: मनसेची पहिली जाहीर सभा ५ ऑक्टोबरला

Raj Thackeray, MNS, Maharashtra Vidhansabha Election 2019, MNS Rally, Raj Thackeray Rally

मुंबई: मुंबईत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज यांनी आगामी विधानसभा निवडणूक ताकदीनं लढवण्याची घोषणा केली. तसंच, ५ ऑक्टोबरला जाहीर सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडेन, असंही स्पष्ट केलं. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये हा मेळावा झाला. राज यांनी यावेळी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज आत्महत्याग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी पाच ते दहा मिनिटे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मनसे निवडणुका लढणार असल्याची माहिती दिली. किती आणि कुठल्या जागा लढवणार याबाबत योग्य वेळी सांगेन असं ते म्हणाले.

‘बरेच दिवस मी बोललो नव्हतो. आता सुरुवात केली आहे. सगळं सांगेन. महाराष्ट्राच्या जनतेपुढं सांगेन,’ असं राज यांनी सांगितलं. त्यामुळं राज ठाकरे नेमकं काय बोलणार याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता राज्यातील राजकीय वातावरण तापवलं होतं. आता विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं पुन्हा एकदा राज यांची ठाकरी तोफ धडाडणार आहे.

दरम्यान, मध्यंतरी मनसे काँग्रेस आघाडीत सहभागी होऊन निवडणूक लढवेल अशी चर्चा रंगली होती; परंतु काँग्रेसकडून मनसेला सोबत घेण्याबाबत सकारात्मकता न दर्शविल्याने ही चर्चा मागे पडली; मात्र त्याचवेळी ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात घेतलेली जाहीर भूमिका व त्यातून त्यांनी अन्य पक्षांना विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा गळ घातला होता. त्यावेळी मनसे निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा होती.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x