20 April 2024 4:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

नितीन नांदगावकरांमुळे सेनेला मुंबई-ठाण्यात उत्तर भारतीय मतांचा फटका बसण्याची शक्यता

Nitin Nandgaonkar, MNS, Shivsena, Uttar Bharatiya Sanmelan

मुंबई: ‘जय महारष्ट्र, मी महाराष्ट्र्र सैनिक’, असे म्हणत सोशल मीडियावर खळखट्ट्याक करणाऱ्या मनसेच्या नितीन नांदगावकर यांनी हातावर शिवबंधन बांधत मनसेची साथ सोडली आहे. नितीन नांदगावकर यांच्याकडे मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस पद होते. त्यांनी बुधवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांना धक्का बसला आहे. त्यानंतर समाज माध्यमांवर चर्चा रंगली ती नितीन नांदगांवकर यांना मनसेने तिकीट का नाकारलं याचीच.

आम्ही नितीन नांदगावकर यांच्या बाबतीत घडलेल्या सहा महिण्यातील एकूण घडामोडींचा मागोवा घेतल्यावर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नितीन नांदगावकर हे शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मागील ६ महिन्यांपासून संपर्कात होते. विशेष म्हणजे काही डमी काँट्रॅक्टर कंपनीच्या माध्यमातून त्यांनी पीडब्लूडी’चे (सार्वजनिक बांधकाम विभाग) खात्याशी संबंधित कॉन्टॅक्ट मिळाले असल्याचं वृत्त आहे, आमची टीम त्याचा मागोवा घेत असून, त्याचे मूळ सूत्रधार शोधण्याच्या मार्गावर आहेत. त्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणेज काही महिन्यापूर्वी स्वतःच्या कार्यालयासाठी जागा आणि भाडं परवडत नसणारे नितीन नांदगावकर अचानक महागड्या गाड्या मिरवताना दिसत आहेत. इतकंच नाही तर ठाण्यातील मनसेच्या एका दिलदार विभागाध्यक्षाने त्यांना स्वतः फोन करून ठाण्यात स्वखर्चाने कार्यालय देण्याचा प्रस्ताव दिला होता, जो त्यांनी नाकारला आणि त्याला कारण म्हणजे त्यांचं मनसे सोडण्याचं आधीच ठरलं होतं असं समोर आलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि त्यानंतर मनसेने काही दिवसांनी निवडणूक लढविण्याचं निश्चित केलं. त्यानंतर मनसेने मतदारसंघानिहाय उमेदवारांना मुलाखतींना बोलावलं. त्याप्रमाणे विक्रोळीतील पदाधिकाऱ्यांनी स्वतः त्यांचं नाव सूचित केलं आणि तुम्ही निवडणूक लढावी अशी विनंती केली. मात्र त्यांनी निवडणूक लढविण्यावरून स्थानिक पदाधिकाऱ्यांना टाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांना विनंती करत निवडणुकीला उभं राहण्याची विनंती केली आणि त्यांनी तोच नकाराचा रेटा सुरु ठेवला. त्यात त्यांचा कुठल्याच एका विशिष्ठ मतदारसंघासाठी हट्ट देखील नव्हता. त्यानंतर पदाधिकाऱ्यांना त्यांच्या एकूणच देहबोलीवरून संशय आला होता. तरी देखील त्यांनी वरिष्ठांच्या कानावर विषय घातल्याचे समजले, मात्र नितीन नांदगावकरांनी फोन उचलणं देखील बंद केलं आणि काल रात्री जो प्रकार घडायचं तो घडला आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना सत्य समजलं.

दरम्यान, सहा महिन्यांपासून शिवसेनेच्या संपर्कात असणारे नितीन नांदगावकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळचे संबंध प्रस्तापित केले होते, ज्याची माहिती पक्षाकडे पोहिचली होती, तरी पक्षाने त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला होता. नितीन नांदगावकर यांना सहा महिन्यांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश देणे अगदी सहज शक्य होतं. मात्र चाणाक्ष शिवसेना नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर मनसे विरुध्द भावनिक वातावरण निर्मितीसाठी, नितीन नांदगावकर यांना मनसेतच थांबून महाराष्ट्र सैनिकांशी समाज माध्यमांच्या माध्यमातून भावनिक सलोखा वाढविण्यास काही काळ जाऊ दिला. त्यानंतर निवडणुकीच्या काळात सामान्यांसाठी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मनसेत काय अवस्था आहे असा भ्रम सर्वत्र आणि विशेष करून महाराष्ट्र सैनिकांमध्ये निर्माण करण्यासाठी उमेदवार निवड प्रक्रिया सुरु असतानाच मातोश्रीवर रात्री उशिरा प्रवेश दिला आणि ज्यासाठी स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातून मुंबईत आले, त्यानंतर समाज माध्यमांवरून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्यात आले.

वात्सवीक ठाणे आणि मुंबईमध्ये उत्तर भारतीयांचे सन्मान मेळावे भरवणाऱ्या शिवसेनेला नितीन नांदगावकर यांच्या प्रवेशाने मोठा फटका बसण्याची शक्यता अधिक आहे. तसेच त्यांना मुंबई आणि ठाणे शहरातील मुख्य प्रचारात गुंतवल्यास तो उत्तर भारतीयांमध्ये चर्चेचा विषय बनू शकतो. अनेक उत्तर भारतीयांना त्यांनी ऑन केमेरा मारल्याने अनेक पुरावे आजही समाज माध्यमांवर आहेत जे शिवसेनेला निवडणुकीच्या तोंडावर नडु शकतात.

नितीन नांदगावकर यांनी जनमानसात राज ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिकाच्या आडून प्रतिमा बनवून घेतली आणि काही महिन्यांपासून ते मनसेतील जनमानसात चांगली प्रतिमा असणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वतःकडे खेचण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र ते कट्टर राज ठाकरे समर्थक निघाल्याने त्यांचा शिवसेना आडून रचला गेलेला डाव फसला आहे असंच काहीस समाज माध्यमांवरील वातावरण आहे. नितीन नांदगावकर यांचा शिवसेनेला प्रत्यक्ष काहीच उपयोग होणार नसून, सेनेतील धुरंदरांनी मनसे कार्यकर्त्यांच्या खच्चीकरणासाठी आणि जनमानसात मनसेबद्दल नकारात्मक संदेश देण्यासाठी केलेला हा एक खटाटोप आहे असंच म्हणावं लागेल, जो पूर्णपणे फसल्याचं मनसे कार्यकर्त्यांची देहबोली सांगते.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x