20 April 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा
x

शहांकडून 'बोला भारत माता की जय' आडून बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या विषयांना बगल

Beed, Amit Shah, Pankaja Mundey, Maharashtra Vidhansabha Election 2019

परळी: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज भाजपने मराठवाड्यातील परळी मतदारसंघातून केला आहे. परळी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये जोरदार लढत होणार आहे. त्यानिमित्त आज दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वतः केंद्रीय मंत्री अमित शाह परळीत पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले.

अमित शहांच्या भाषणातील मुख्य रोख हा काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या मुद्द्यावर होता. तसेच भाषणात त्यांनी मराठवाडा आणि बीडमधील महत्वाच्या विषयांना आणि सामान्य मतदाराच्या दैनंदिन आयुष्यातील मुख्य मुद्यांना पूर्णपणे बगल दिल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे भाजपने संपूर्ण मराठवाड्यात आणि बीडमध्ये सत्ताकाळात नेमका काय विकास केला यावर चकार शब्द न काढता, काश्मीर, भगवान बाबा आणि भारत माता की जय अशा घोषणा देत केवळ भावनिक वातावरण निर्मिती करण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसत होते.

लोकसभा निवडणुकीच्यावेळी दुष्काळाने हैराण झालेल्या मराठवाड्याकडे याच दिल्लीश्वरांनी पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. भाजपचे दिल्लीतील नेते महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक केवळ भावनिक मुद्यांवर लढवण्याचं निश्चित केल्याचे अमित शाह यांच्या भाषणात अधोरेखित झालं आहे. विशेष म्हणजे अमित शाह यांनी संपूर्ण भाषणात बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि मराठवाड्यातील गंभीर प्रश्नांना पूर्ण बगल देत, सगळं काही छान सुरु असल्याचं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असंच म्हणावं लागेल.

देशात बेरोजगारीने ऐतिहासिक उच्चांक गाठला असल्याचा अधीकृत अहवाल सीएमआयई’ने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केला होता. तसेच देशभरात अनेक खाजगी उद्योग बुडीत निघाल्याने बेरोजगारीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होतं आहे. त्यात बँकिंग व्यवस्था देखील वाढत्या एनपीए’मुळे अत्यंत दयनीय आर्थिक पेचात सापडली आहे. लघु उद्योग अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून जात असल्याने रोजंदारीवर काम करणारा कामगार देखील देशोधडीला लागल्याचं अनेक अहवालात समोर आलं आहे. बुडीत उद्योगांमध्ये केवळ खाजगी नव्हे तर सरकारी उपक्रमातील कंपन्यांची अवस्था देखील भीषण झाल्याने सरकारने त्यातील त्यातील हिस्सेदारी खाजगी समूहांसाठी खुली केल्याचे दिसते. महिलांवरील अत्याचार देखील वाढतच असून, त्याबाबत भाजपचे वरिष्ठ नेते जराही बोलण्यास उत्सुक नाहीत.

सध्या राज्यात आणि देशात बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, ढासळलेली अर्थव्यवस्था, महिलांसंबंधित गुन्ह्यातील वाढ असे एक ना अनेक गंभीर प्रश्न रुद्ररूप धारण करत असल्याने भारतीय जनता पक्षाने या विषयांना दुर्लक्ष करत, केवळ भावनिक मुद्दे पुढे रेटून निवडणूक लढण्याची रणनीती आखल्याचे सिद्ध झाले आहे आणि पुढे देखील बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, ढासळलेली अर्थव्यवस्था हे गंभीर विषय भाजप नेत्यांच्या भाषणात ऐकू येणार नाहीत हे देखील स्पष्ट झालं आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x