25 April 2024 11:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी?
x

ठाणे शहर: मुख्यमंत्र्यांची सभा फ्लॉप; सभेतील रिकाम्या खुर्च्यांची चर्चा

CM Devendra Fadnavis, Thane City Vidhansabha Election 2019, Empty Chairs, MNS Avinash Jadhav

ठाणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या राज्यभर सभांचा सपाटा लावला असून त्यांच्या दिवसाला ३-४ सभा नियोजित असल्याचं कळतं. मात्र अनेक ठिकाणच्या आयोजकांनी सभेसाठी मागवलेल्या खुर्च्या देखील भरत नसून त्यांच्या सभेकडे लोंकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. प्रसार माध्यमांचे कॅमेरे सभेतील केवळ स्टेजचं चित्रीकरण करत असल्याने इतर वास्तव समोर येत नसल्याचं निर्दशनास येतं आहे.

तसाच काहीसा प्रकार ठाण्यातील सभेत पाहायला मिळाला आहे. भाजपचे ठाणे शहर येथील आमदार संजय केळकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित केली होती. मात्र यावेळी २००-३०० खुर्च्या देखील भरल्या नव्हत्या असं चित्र पाहायला मिळालं. विशेष म्हणजे खुर्च्या मोठ्या प्रमाणात मागविण्यात आल्या होत्या. मात्र स्थानिक मतदारांनी या सभेकडे पाठ फिरवल्याने आणलेल्या खुर्च्या तशाच थर लावून बाजूला ठेवण्यात आल्याचं दिसत होतं.

त्यामुळे फडणवीसांच्या ट्विटर अकाउंट आणि फेसबुक अकाऊंटवरून केवळ स्टेजचं चित्र दाखविण्यात येत असून समोरील वास्तव लपवण्यात येतं आहे. त्यामुळे ठाण्याच्या सभेतील खाली खुर्च्या विद्यमान आमदार संजय केळकर यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जातं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाण्यातील प्रचारसभेत उपस्थित असलेल्या पंजाब महाराष्ट्र (पीएमसी) बँकेच्या संतप्त खातेदारांनी अचानक निदर्शने केल्याने खळबळ उडाली. हातात फलक घेऊन न्याय देण्याची मागणी करणाऱ्या या खातेदारांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन याचा पाठपुरावा करून पंतप्रधानांनाही यात लक्ष घालण्यास सांगेन, असे आश्वासन खातेधारकांना दिले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शुक्रवारी ठाण्यात आले होते. ठाणे महापालिकेसमोरील रस्त्यावर रात्री पार पडलेल्या जाहीर प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा उहापोह केला. दरम्यान,सभा संपल्यानंतर माघारी निघत असतानाच महापालिका मुख्यालयाच्या आवारात गोळा झालेल्या पीएमसी बँक खातेदारांनी हातातील फलक दर्शवून मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने करण्यास सुरुवात केली.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x