24 April 2024 12:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा सर्वात स्वस्त शेअर तेजीत, 2 दिवसात दिला 14% परतावा, यापूर्वी 2926% परतावा दिला Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता IREDA Share Price | IREDA शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल? तज्ज्ञांनी जाहीर केला सपोर्ट लेव्हल आणि रेझिस्टन्स लेव्हल Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट आली, शेअर मोठ्या रॅलीसाठी सज्ज झाला, किती फायदा होईल? Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली IPO GMP | स्वस्त IPO शेअर आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 113 टक्के परतावा, GMP चा धुमाकूळ
x

अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातलं नोबेल जाहीर

abhijeet banarjee, Nobel for economics, Amartya Sen

नवी दिल्ली: भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यावर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. मूळ भारतीय असलेले अभिजीत बॅनर्जी सध्या अमेरिकेतल्या प्रतिष्ठित मेसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांच्यासोबत आणखीही दोन जणांना अर्थशास्त्रासाठी हा मानाचा नोबेल पुरस्कार मिळाला.

याआधी भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनाही १९९८ मध्ये अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्यानंतर अनेक वर्षांनी भारतीय अर्थतज्ज्ञाला हा पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्यानंतर प्रदीर्घ काळाने भारतीय अर्थशास्त्रज्ञाला नोबेल देऊन गौरवण्यात आलं आहे. रविंद्रनाथ टागोर, सी. व्ही. रामन, मदर तेरेसा, अमर्त्य सेन आणि कैलाश सत्यर्थी या पाचजणानंतर नोबेल पुरस्कार जिंकणारे अभिजित बॅनर्जी हे सहावे भारतीय आहेत. तर अमर्त्य सेन यांच्यानंतर अर्थशास्त्रातले नोबेल मिळवणारे अभिजित बॅनर्जी हे दुसरे भारतीय ठरले आहेत.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x