19 April 2024 3:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
x

ओमराजे निंबाळकरांवर हल्ला करणारा भाजपचा आयटी सेलचा तालुका अध्यक्ष

MP Omraje Nimbalkar, Shivsena

उस्मानाबाद: जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर भर प्रचारात चाकू हल्ला झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र या हल्ल्यामागे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाची पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर येत आहे. हल्लेखोर अजिंक्य टेकाळे हा तरुण हल्ल्यानंतर फरार झाला होता. मात्र आता त्याला पोलिसांनी अटक केली आहे. टेकाळे हा भाजपचा कट्टर कार्यकर्ता असून गेल्या काही दिवसांपासून तो ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात फेसबुक पोस्ट टाकत होता. विधानसभेसाठी भाजप-सेना युती झाल्यानंतर निंबाळकर यांनी युतीविरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळेच अजिंक्य टेकाळे नाराज होता.

हल्लेखोर अजिंक्य टेकाळे हा कळंब भाजपा आयटी सेलचा तालुका अध्यक्ष आहे. अजिंक्य अजूनही फरार आहे. अजिंक्यने ओमराजेंच्या विरोधात फेसबूकची पोस्टही टाकलेली असल्याचं समोर आलं आहे. तसंच यावेळी शिवसेनेला नव्हे तर राष्ट्रवादीला मदत करणार असल्याचा उल्लेखही पोस्टमध्ये केला आहे.

‘जोपर्यंत शिवसेना संपणार नाही तोपर्यंत उस्मानाबाद-कळंब मतदारसंघात भाजपचा मेळ लागणार नाही, म्हणून यावेळेस घड्याळ. अरे ओमदादा तुळजापुरात युती नको, मग कळंबमध्ये कशी होणार? एक कट्टर भाजप कार्यकर्ता आता मग संजय मामाच की.’ अशी फेसबूक पोस्ट अजिंक्यने लिहिली आहे.

ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झाला आहे. उस्मानाबादच्या नायगाव पाडोळीत हा हल्ला झाला. उस्मानाबाद – कळंब मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार ओमराजे निंबाळकर आले होते. त्यावेळी गाडीतून उतरता क्षणी हल्लेखोरानं वार केला. ओमराजेंना गंभीर दुखापत झालेली नाही, मात्र त्यांच्या घड्याळावर आणि हातावर जखम झाली आहे.

ओमराजे निंबाळकर यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ कळब शहर बंद ठेवण्यात आलं आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून माझ्या सभांमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज तर थेट माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचाच प्रयत्न करण्यात आला. याबाबत मी कुणावर आरोप करणार नाही, मात्र याबाबत मी पोलिसांना अवगत केलं आहे,’ असं ओमराजे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळातही या मुद्द्यावरून उस्मानाबादमधील राजकारण पेटणार असल्याचं दिसत आहे. दरम्यान, कळंब तालुक्यातल्या नायगाव पाडोळी गावात ओमराजेंवर चाकूहल्ला झाला. या हल्ल्यात ओमराजे यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसली तरी हल्लोखोराला त्यांच्या पोटात चाकू मारायचा होता, असे ओमराजेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x