29 March 2024 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

'म मराठीचा म मुलुंडचा' इम्पॅक्ट; मुलुंडमध्ये मनसेची लॉटरी लागण्याची शक्यता: सविस्तर

MNS party, Raj Thackeray

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मनसेने बराचवेळ उमेदवार निश्चित करण्यात घालवला. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जोश आल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात एकूण २० सभा घेतल्या आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, मनसेला कल्याण ग्रामीण, हडपसर, ठाणे शहर, डोंबिवली, वणी, कोथरूड, कसबा, माहीम, मागाठणे, घाटकोपर पश्चिम आणि कालीना मतदारसंघातून मोठ्या अपेक्षा असल्याचं पाहायला मिळालं. मात्र असे अनेक मतदारसंघ आहेत ज्यांची अपेक्षा आणि हवा पक्षातही नव्हती. त्यातील एक मतदारसंघ म्हणजे मुलुंड मतदारसंघ म्हणावा लागेल. कारण मुंबई आणि ठाणे शहरातील अनेक मतदारसंघ जेथे भाजपचा उमेदवार आहे, तेथील मराठी मतं मोठ्याप्रमानावर मनसेच्या उमेदवाराकडे वर्ग झाल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी मुलुंड विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर तसे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.

मुलुंडमध्ये मोठ्या प्रमाणावर गुजराती वर्ग असला तरी त्यातुलनेत मराठी मतदार हा तब्बल त्यापेक्षा दुप्पट आहे. मात्र गुजरातीकरण होत चाललेला हा मतदारसंघ गुजराती नेत्यांचे बालेकिल्ले होऊ लागल्याने येथे समाज माध्यमांच्या माध्यमातून ‘म मराठीचा म मुलुंडचा’ हे अनोखं अभियान राबवून मराठी मतदाराला जागृत करण्यात आलं. त्यासाठी निरनिराळ्या अनिमेशन्सचा उपयोग करण्यात आला आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे त्या अभियानाचा परिणाम इतका मोठा झाला की मागील ३-४ दिवस भाजपचे स्थानिक नेते हे अभियान कोण राबवत आहे याचा ऑफलाईन शोध घेत होते. मात्र त्यांना कोणताही सुगावा लागलेला नाही. मात्र या अभियानाला स्थानिक शिवसेनेच्या लोकांनी आणि मतदाराने देखील मोठा पाठिंबा दर्शविला. मुलुंड पूर्वेला मोठ्या प्रमाणावर मराठी मतदार असल्याने येथे मनसेला तुफान मतदान झाल्याचं म्हटलं जातं आहे.

विशेष म्हणजे भाजपमध्ये गेलेले मनसेचे मराठी पदाधिकारी सुद्धा ‘ए ४ नंबरचं बटन दाबायचं, आपला मराठी माणूस आहे’ असं मतदाराला प्रेमाने सांगत होते आणि त्यामुळे इथे धक्कादायक निकाल लागणार हे २ वाजण्याच्या सुमारास दिसू लागलं होतं. दरम्यान, गुजराती मतदाराने देखील खूप उत्साह दाखवला नसला तरी मराठी टक्का एक गठ्ठा मनसेकडे वर्ग झाल्याचं स्थानिक घडामोडीवरून समजत आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यात असे प्रकार किती ठिकाणी झाले आहेत त्यासाठी २४ तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x