29 March 2024 3:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले १० हजार मतांनी पिछाडीवर

Udayanraje Bhosale, Shrinivas patil, Satara Loksabha By Poll

सातारा: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची सत्ता येणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. निकालाचा पहिला कल महायुतीच्या बाजूने लागला आहे. जवळपास १०० च्या वर महायुतीने आघाडी घेतली आहे तर महाआघाडी ६० जागांच्या वर आलेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले तब्बल १० हजार मतांनी पोछाडीवर असल्याचं समजतं आणि येथे उदयनराजे भोसले यांना जोरदार धक्का मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अर्थात उदयनराजे भोसले आणि श्रीनिवास पाटील यांच्यात ही लढत आहे. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना तब्बल १० मतांची आघाडी मिळाल्याने उदयराजे यांच्यावर सातारकर संतापल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी देखील उदयनराजे भाजपमध्ये पराभूत झाले आहेत आणि तोच इतिहास पुन्हा घडणार असं म्हटलं जातं आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x