23 April 2024 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी कायम राहणार? अपडेटनंतर तज्ज्ञांचे मत काय? GTL Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजची कृपा झाली, स्वस्त GTL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटले? Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून स्टॉक प्राईस सपोर्टसह पुढची टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, 1736 रुपयांनी स्वस्त झालं, नवे दर तपासून घ्या Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय?
x

भाजप-सेनेत प्रवेश करणाऱ्या तब्बल १९ आयात उमेदवारांचा पराभव

Shivsena, BJP, Congress, NCP, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबई: विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीची हवा असल्याचा अंदाज बांधून महायुतीत गेलेल्या १९ आयारामांचा पराभव झाला आहे. त्यामुळे ऐनवेळी पक्षांतर करणाऱ्या आयारामांना मतदारांनी नाकारल्याचं स्पष्ट झालं आहे. महायुतीत आलेले १६ आयाराम जिंकले आहेत.

पंचायतीपासून ते महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक निवडणूक भाजपने जिंकल्या होत्या. त्यामुळे महायुतीला वातावरण अनुकूल असल्याचं हेरून काही आमदारांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला होता. निवडणुकीपूर्वी तब्बल ३५ आयारामांनी महायुतीत प्रवेश केला होता. त्यापैकी १९ आयारामांचा पराभव झाला. तर १६ आयारामांचा विजय झाला. पराभूत झालेल्या आयारामांपैकी शिवसेनेत आलेल्या १९ आणि भाजपमध्ये आलेल्या ८ आयारामांचा समावेश आहे. ३५ आयरामांपैकी १० आयाराम निवडणून आल्याने भाजपच्या जागा वाढल्या आहेत. त्यामुळे भाजपला शंभर पर्यंतचा आकडा गाठता आला आहे.

शिवसेनेतील पराभूत आयात उमेदवार;

  1. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला आहे.
  2. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या दिलीप सोपल यांचा पराभव झाला आहे. अपक्ष लढणाऱ्या राजेंद्र राऊत यांनी सोपल यांचा पराभव केला आहे.
  3. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या भाऊसाहेब कांबळे यांचा श्रीरामपूर मतदारसंघात पराभव झाला आहे.
  4. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या शेखर गोरे यांचा माण-खटाव मतदारसंघातून पराभव झाला आहे.
  5. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या रश्मी बागल यांचा करमाळा मतदारसंघात पराभव झाला आहे.
  6. शिवसेनेत आलेल्या विजय पाटील यांचा वसई मतदारसंघात पराभव झाला आहे.
  7. शिवसेनेत आलेल्या संजय कोकाटे यांचा माढा मतदारसंघात पराभव झाला आहे.
  8. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या दिलीप माने यांचा सोलापूर मध्य मतदारसंघात पराभव झाला आहे.
  9. शिवसेनेत आलेल्या नागनाथ क्षीरसागर यांचा मोहोळ मतदारसंघात पराभव झाला आहे.
  10. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या निर्मला गावित यांचा इगतपुरी मतदारसंघात पराभव झाला आहे.
  11. माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. परंतु त्यांचा पराभव झाला आहे.

भाजपमधील पराभूत आयात उमेदवार;

  1. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या वैभव पिचड यांचा अकोले मतदारसंघात पराभव झाला आहे.
  2. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर मतदारसंघात पराभव झाला आहे.
  3. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या गोपालदास अग्रवाल यांचा गोंदिया मतदारसंघात पराभव झाला आहे.
  4. वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये आलेल्या गोपिचंद पडळकर यांचा बारामती मतदारसंघात पराभव झाला आहे.
  5. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या धैर्यशील कदम यांचा कराड उत्तर मतदारसंघातून पराभव झाला आहे.
  6. भाजपमध्ये आलेल्या रमेश आडसकर यांचा माजलगावमधून पराभव झाला आहे.
  7. भाजपच्या भरत गावित यांचा नवापूर मतदारसंघातून पराभव झाला आहे.
  8. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या उदयनराजे भोसले यांच्या पराभव झाला आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x