25 April 2024 9:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर
x

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री; शुक्रवारपर्यंत पदाची शपथ घेणार?

CM Devendra Fadnavis

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालीच राज्याचा कारभार चालवणार असं शिवसेनेला ठणकावून सांगणारे देवेंद्र फडणवीस हे येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. सत्तेत समान वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर सध्या ठाम असलेली शिवसेना एक पाऊल मागे घेईल, अशी भाजपची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०१४ प्रमाणेच आपल्या दुसऱ्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तसंच शिवसेना भाजपासोबत सत्तेत सहभागी होईल, अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते सध्या शिवसेनेची मनधारणी करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत आहे. देवेंद्र फडणवीस हे ३१ ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती एका नेत्यानं दिली. तसंच शिवसेनाही सत्तेत सहभागी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना इतर श्रेणीतले अपक्ष पाठिंबा देत आहेत. आत्तापर्यंत भाजपला ८ तर शिवसेनेला ४ अपक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या दोघांची आमदारसंख्या आता अनुक्रमे ११३ आणि ६० झाली आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून शिवसेना देखील सत्तेमध्ये सहभागी असेल, अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचं देखील समजतंय. दरम्यान, याबदल्यात शिवसेनेला कोणती खाती मिळणार, याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि काही मंत्रीपदं मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x