19 April 2024 2:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार? Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर Reliance Power share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स पॉवर शेअर होल्ड करावा की बाहेर पडावे?
x

राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती

Mumbai Police datta padsalgikar, NSA, NSA Deputy Advisor

नवी दिल्ली: राज्याचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी (अंतर्गत सुरक्षा) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पडसलगीकर आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे सहाय्यक म्हणून काम करणार आहेत.

मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तपास कामात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर या हल्ल्याचे धागेदोरे त्यांनी शोधून काढले होते. त्यांनीच केलेल्या प्रयत्नांमुळे अतिरेकी आणि त्यांच्या म्होरख्यांमध्ये झालेलं महत्त्वाचं संभाषणही आपल्या सुरक्षा यंत्रणांना मिळालं होतं. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्येही त्यांनी सुरवातीच्या काळात काम केलं होतं. मुंबईतल्या काही टोळ्यांचं कंबरडही त्यांनी मोडलं होतं. अतिशय मितभाषी पण कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.

पडसलगीकर हे आयबीमध्ये कार्यरत होते. तेथून ते मुंबईत पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणूनही काम पाहत होते. निवृत्तीनंतर राज्य सरकारने त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. अजित डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत तर पडसलगीकर हे आता उपसल्लागार म्हणून काम पाहतील. त्यांच्याकडे अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असेल.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x