18 April 2024 10:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

अमित शहा उद्या मुंबईत येण्याची शक्यता; मोठ्या राजकीय हालचालींना वेग

BJP President Amit Shah, BJP Maharashtra

मुंबई: देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत असून भारतीय जनता पक्षात वरिष्ठ पातळीवर जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्याचे वृत्त आहे. त्यानुषंगाने राज्यात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली दोन्ही बाजूने पुढे सरकल्या असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्या तडकाफडकी मुंबईत दाखल होणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत. ते सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावयाचा काय? या मुद्याभोवती ही चर्चा फिरणार असल्याचे समजते. निकालानंतर ते देखील पहिल्यांदाच दिल्लीला आले आहेत. आज शरद पवार आणि काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात दिल्लीत चर्चा होणार आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय पेचावर आता दिल्लीतच तोडगा निघण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना आता वेग आलाय. महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाच्या बैठका, चर्चा आणि भेटीगाठीचा असणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल ११ दिवसांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत. निकालानंतर प्रथमच मुख्यमंत्री फडणवीस भाजपश्रेष्ठींना भेटणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेणार आहेत. सत्तास्थापनेमधल्या तिढ्यावर ते या भेटीत चर्चा करणार आहेत.

दरम्यान, खासदार राऊत हे सोमवारी राजभवनावर जाऊन राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे राऊत यांनी सांगितले. सरकार स्थापनेसाठी सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षास सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करावे, अशी विनंती राऊत राज्यपालांना करणार आहेत. यामुळे तर्कवितर्काना उधाण आले आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x