20 April 2024 3:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

शिवसेनेचे सर्व वाघ मुंबईतील रंगशारदा हॉटेलमध्ये बंधिस्त

BJP, Shivsena, Shivsena MLA, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबई: राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना आज वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या बैठका एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे आज शिवसेनेच्या आमदारांचीही बैठक पार पडली. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासह सत्तेतल्या समान वाटपावर शिवसेना ठाम आहे. आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून सावधगिरी बाळगण्यात येत असून सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. ‘मला युती तोडण्याची इच्छा नाही; पण जे ठरलंय तेच व्हावं. आमची बाकी काही अपेक्षा नाही,’ अशी आपली भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे.

शिवसेनेचे ५६ आमदार अधिक शिवसेनेला पाठिंबा देणारे आठ आमदार असे एकूण ६४ आमदार मातोश्रीहून रंगशारदा येथे गेले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत वांद्रे येथील या हॉटेलमध्ये हे सर्व आमदार थांबणार आहेत. दरम्यान, काळजीवाहू सरकारची मुदत संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने सत्तास्थापनेचा पेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना सोडवावाच लागणार आहे. त्यादृष्टीने आज हालचालींना वेग आला आहे.

या आजच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, नितीन गडकरींनी भाजपाचं म्हणणं कसं योग्य आहे, हे पटवून दिलं. भारतीय जनता पक्षाचे १०५ आमदार निवडून आलेत आणि शिवसेनेचे ५६ आमदार आहेत. युती किंवा आघाडीत ज्यांचे जास्त आमदार, त्यांचाच मुख्यमंत्री होत असतो, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. थोडक्यात, भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रिपदावर तडजोड करण्याच्या मनःस्थितीत नसल्याचंच त्यांनी सूचित केलं आहे. शिवसेनेशी चर्चा सुरू आहे आणि राज्याच्या हिताचा मार्ग लवकरच निघेल, असंही त्यांनी नमूद केलं.

राज्यातील सत्तापेच कठीण बनला असताना मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन भूमिका स्पष्ट केली असताना, आज गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक एकाच व्यासपीठावर येत आहेत.

मुंबईत सत्तास्थापनेचा तिढा सुरू आहे. तो सुटत नसताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारी रात्री अचानक मुख्यमंत्री नागपुरात दाखल झाले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन त्यांना सत्तासंघर्षाची माहिती दिली. त्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सरसंघचालकांना भेटणार आहेत. स्वर्गीय विलास फडणवीस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘जिव्हाळा’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि जिव्हाळा पुरस्कार वितरण कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी साडे सहा वाजता सायंटिफिक सोसायटीच्या सभागृहात होणार आहे. तिथे दोघेही उपस्थित राहणार आहेत. ते काय बोलतात, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिवसेनेशिवाय सरकार स्थापनेचा दावा करु नका असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी रात्री नागपूरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. या घडामोडींशी संबंधित असलेल्या जवळच्या सूत्राच्या हवाल्याने मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार बनवणार असेल तर त्यांना सरकार स्थापन करु द्या. विरोधी पक्षात राहून जनतेची सेवा करण्यासाठी तयार राहा. घोडेबाजाराच्या घाडेरडया राजकारणात पडू नका. दीर्घकाळाचा विचार करता भारतीय जनता पक्षासाठी ते हिताचे राहणार नाही असे भागवत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x