20 April 2024 3:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

राज्याचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचं निधन

IPS Arvind Inamdar, DGP Arvind Inamdar, Mumbai Police, Maharashtra Police

मुंबई: राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे मुंबईतील हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. प्रामाणिक, न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून इनामदार यांची ख्याती होती. त्यांनी नेहमीच पोलीस दलातील अयोग्य आणि चुकीच्या गोष्टींवर सतत हल्ला चढवला होता. यामुळे ते नेहमीच चर्चेत असत. लेखक म्हणूनही अरविंद इनामदार प्रसिद्ध होते.

अरविंद इनामदार यांनी नाशिकमधील पोलिस प्रशिक्षण केंद्रात दीर्घकाळ काम केलं. त्यांच्या नेतृत्त्वात पोलिस दलात अनेक विद्यार्थी घडले. अरविंद इनामदार यांनी गाजलेलं जळगाव सेक्स स्कॅण्डलचं प्रकरण यशस्वीपणे हाताळलं होतं. त्यांनी नेहमीच पोलिस खात्यातील अयोग्य आणि चुकीच्या गोष्टींवर सतत हल्ला चढवला होता. यामुळे ते नेहमीच चर्चेत असत.

इनामदार हे पोलीस दलात कार्यरत असले तरी ते मनाने अतिशय संवेदनशील होते. त्यांच्यातील माणूस कायम जागा होता. म्हणून त्यांनी जपलेली मूल्ये आणि माणुसकीशी कधीही तडजोड केली नाही. आपल्या भगवद्गीतेचा मोठा प्रभाव असल्याचे ते नेहमी सांगत. इनामदार साहित्य वर्तुळातही तितकेच लोकप्रिय होते. लेखक म्हणूनही ते सर्वांना परिचित होते. खुसखुशीत भाषा शैली, आणि विनोदबुद्दीमुळे ते ऐकणाऱ्यांच्या मनाची सहज पकड घेत असत.

अरविंद इनामदार यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तडसर गावात झाला होता. अरविंद इनामदार १ ऑक्टोबर १९९७ ते ५ जानेवारी २००० या दरम्यान राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत होते. पोलिस खात्यातील सर्वोच्च पदावर काम करताना वेळप्रसंगी सरकारच्या निर्णयाला विरोध करत, एक वर्ष आधीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x