16 April 2024 1:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची ट्रेडिंग रेंज 20-30 रुपये मध्ये अडकली, सकारात्मक बातमीनंतर तज्ज्ञांनी काय म्हटलं? IREDA Share Price | IREDA शेअर्स 30 टक्क्यांची उसळी घेणार? तज्ज्ञांनी जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस Vodafone Idea Share Price | एका वर्षात 113% परतावा देणारा 12 रुपयाचा शेअर कोसळणार? तज्ज्ञांचा इशारा काय? Adani Power Share Price | अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा दबावाखाली? शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता वाढणार?
x

शिवसेनेच्या आमदाराला भाजपकडून ५० कोटींची ऑफर: काँग्रेस आ. विजय वडेट्टीवार

Shivsena, BJP, Congress, Vijay Vaddetiwar

मुंबई: १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ संपायचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह सर्व विधानसभा आमदार राजीनामा देतील. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पक्षाने अद्याप सत्तास्थापनेचा दावा केला नाही. या पार्श्वभुमीवर राज्यात आमदार फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. शिवसेनेचे सर्व आमदार रंगशारदामध्ये आहेत. काँग्रेसचे नेते जयपूरला गेले आहेत. या पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती आरोप केले आहेत.

शिवसेनेच्या एका आमदाराला फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार यांच्या या माहितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधी पक्ष अधिक सावध झाले आहेत. काँग्रेसच्या काही आमदारांनाही भारतीय जनता पक्षाकडून फोन आले असून त्यांना फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु, आमचे आमदार सुरक्षित असून आमचा कोणताही आमदार फुटणार नसल्याचा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

आमचे आमदार फुटणार नाहीत याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. निवडणुकीच्यापूर्वी भारतीय जनता पक्षाने फोडाफोडी केली, परंतु जनतेने हे सहन केले नाही. भारतीय जनता पक्ष जनतेशी बेईमानी करते आहे. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र माफ करणार नाही. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात आली तर ते पाप भारतीय जनता पक्षाचं असेल यात काहीही शंका नाही असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. भारतीय जनता पक्षाने एकदा समोर येऊन सांगावं की आम्ही सत्ता स्थापन करु शकत नाही. दुसऱ्यांना संधी द्या. स्वतः सरकार स्थापन करायचं नाही आणि दुसऱ्याला संधी द्यायची नाही. भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रपती राजवट आणण्याचा डाव सुरु आहे असाही आरोप वडेट्टीवार यांनी केला.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x