24 April 2024 10:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO शेअर आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 113 टक्के परतावा, GMP चा धुमाकूळ Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला
x

आमदार खरेदीचे आरोप खोटे; काँग्रेस-राष्ट्रवादीने पुरावे द्यावेत: मुनगंटीवार

BJP Leader Sudhir Mungantiwar, Congress, NCP

मुंबई: भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेसाठी आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची खोटी माहिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने दिली असून येत्या ४८ तासांत या पक्षांनी या आरोपाबाबत पुरावे द्यावे, अन्यथा राज्यातील जनतेचा माफी मागावी, असे आवाहन बारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याने कोणत्याही आमदाराला फोन केलेला नाही, कुणाकडे कॉल रेकॉर्डिंग असेल, तर त्यांनी ती सादर करावी, असे आव्हानही मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षांना दिले आहे. मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते.

तत्पूर्वी, शिवसेनेच्या एका आमदाराला फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार यांच्या या माहितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधी पक्ष अधिक सावध झाले आहेत. काँग्रेसच्या काही आमदारांनाही भारतीय जनता पक्षाकडून फोन आले असून त्यांना फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु, आमचे आमदार सुरक्षित असून आमचा कोणताही आमदार फुटणार नसल्याचा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते नितीन राऊत यांनी देखील भाजपचे नेते काँग्रेसच्या एक दोन आमदारांकडे २५ कोटीची ऑफर घेऊन आल्याचं सांगत खळबळ उडवून दिली आहे.

सत्ता-स्थापनेबाबतची कोंडी फुटेल असा मला विश्वास आहे. जनतेने महायुतीला जो जनादेश दिला आहे त्याचा आम्ही आदर करतो. शिवसेनेने असं कधीही म्हटलं नाही की आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत चाललो आहोत. त्यामुळे कधीतरी चर्चेतून तोडगा निघेल आणि गोड बातमी येईलच, त्यासाठी वेट अँड वॉच, असेही यावेळी मुनगंटीवार म्हणाले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x