29 March 2024 12:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

राष्ट्रवादीची सोनी टीव्हीच्या कार्यालयावर निदर्शनं; सोनी टीव्हीचा माफीनामा

KBC 11, Amitabh Bachchan, Chhatrapati Shivaji Maharaj, SONY TV

मुंबई: अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीमध्ये त्यांच्या संयत सूत्रसंचालनाच्या शैलीसाठी ओळखले जातात. पण त्यांच्या कार्यक्रमात एका प्रश्नाच्या पर्यायातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याचा आरोप झाल्याने नवा वाद ओढवला आहे. अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे. यामुळेच अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

नुकत्याच प्रसारित झालेल्या KBC च्या एपिसोडमध्ये अमिताभ यांनी हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला मुघल सम्राट औरंगजेबसंबंधी प्रश्न विचारला. त्याच्या उत्तराला चार पर्याय देण्यात आले आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात आला. त्यामुळे नाराजी पसरली आहे आणि बिग बींनी यासाठी माफी मागावी अशी मागणी होत होती.

या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख करण्यात आला होता. औरंगजेबच्या नावापुढे ‘मुघल सम्राट’ लावू शकता तर राज्याभिषेक झालेल्या छत्रपतींचा उल्लेख एकेरी का?, असा प्रश्न विचारला जात आहे. शिवरायांचा एकेरी उल्लेख पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. ट्विटरवर नेटिझन्स #boycottKBC हा हॅशटॅश सुरु करुन ‘कौन बनेगा करोडपती-११’ न पाहण्याचं आवाहन करत होते.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी आता सोनी टीव्हीकडून घडल्याप्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. सोनी वाहिनीनं झालेली चूक मान्य करत माफी मागितली आहे.

‘कौन बनेगा करोडपती-११’ च्या एका भागात प्रश्नाचे पर्याय सांगताना अमिताभ बच्चन यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला. अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा अपमान केल्याचे म्हणत शिवप्रेमींनी अमिताभ बच्चन यांना जाब विचारत त्यांच्यावर ताशेरे ओढले. अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरायला लागली. हे प्रकरण अधिक चिघळण्याआधीच सोनी वाहिनीकडून माफीनामा जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, सोनीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा नामोल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्या मार्गदर्शनाखाली सोनीच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. त्यांनतर सोनी टीव्हीच्यावतीने राष्ट्रवादीकडे लेखी माफीनामा देण्यात आली असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x