16 April 2024 10:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांनो! महिना 1100 रुपयांची SIP बचत देईल 20 लाख रुपये, खास योजना सेव्ह करा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना 5,000 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर देईल रु. 3,56,829 देईल Numerology Horoscope | 16 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 16 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Man Infra Share Price | शेअर असावा तर असा! गुंतवणूकदारांना दिला 1900% परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर Varun Beverages Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत दिला 50% परतावा, स्टॉक पुढे किती फायद्याचा? Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 593 टक्के परतावा, शेअरमध्ये पुढे तेजी येणार?
x

बाळासाहेबांनीच भाजपाला महाराष्ट्रात स्थान दिलं: माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा

NCP, Shivsena, BJP, HD Deve Gowda, Balasaheb Thackeray

बेंगळुरू: महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का देत शिवसेनेने काँग्रेस आणि एनसीपी’ला सोबत घेऊन सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील या राजकीय उलथापालथीवर अनेक मतप्रवाह पाहायला मिळत असताना माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे व काँग्रेसलाही महत्त्वाचा असा सल्ला दिला आहे.

“जर काँग्रेसने शिवसेनेला समर्थन दिलं तर त्यांनी पाच वर्ष पाठिंबा कायम ठेवला पाहिजे. त्यानंतर लोकांचा काँग्रेसवर विश्वास बसेल,” असं मत एच डी देवेगौडा यांनी व्यक्त केलं आहे. तसंच पुढे बोलताना त्यांनी बाळासाहेबांनीच भारतीय जनता पक्षा’ला महाराष्ट्रात स्थान निर्माण करुन दिलं असल्याची आठवण करुन दिली.

“बाळासाहेबांनीच भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात स्थान दिलं. अडवाणी आणि वाजपेयींनी बाळासाहेबांच्या निवासस्थानी जाऊन जागा देण्यासाठी विनंती केली होती. भारतीय जनता पक्षाला याचा विसर पडला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे भारतीय जनता पक्षाला खाली खेचण्याची संधी आहे,” असं एच डी देवेगौडा यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x