28 March 2024 2:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या Zomato Share Price | झोमॅटो शेअरने ब्रेकआऊट दिला, अल्पावधीत मोठी कमाई होणार, पुढील टार्गेट प्राइस जाणून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करणारा 42 रुपयाचा शेअर! 1 वर्षात 2400% परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर? IRFC Vs RVNL Share | या शेअरने 1 वर्षात दिला 297% परतावा, आता कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉकवर परिणाम होणार? Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअरवर परिणाम होणार? तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

ब्राझिल दौऱ्यावर निघण्यापूर्वी मोदींनी अचानक केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली

PM Narendra Modi, Brics, Brazil Tour

मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. राज्यपालांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं हे दोन्ही पक्ष सरकार बनविण्यात असमर्थ ठरले असून राज्यपालांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं होतं. मात्र राष्ट्रवादी शिवसेनेच्या पाठिंब्यावर अवलंबून असल्याचं दिसून येत असल्याने राज्यपालांनी कायदेशीर सल्ला घेत केंद्रीय गृहमंत्रालयाला ही शिफारस पाठविली असल्याची माहिती सरकारी वृत्तवाहिनी दूरदर्शनने दिली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. राज्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे राष्ट्रपती राजवटीसाठी शिफारस केली असल्याने यावर निर्णय घेण्यासाठीच मोदी यांनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान मोदी ब्राझिलच्या दौऱ्यावर जात असल्याने ही बैठक तातडीने बोलावली असल्याचे सांगण्यात येत आहे.

तत्पूर्वी, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी सोनिया गांधींचे निकटवर्तीय अहमद पटेल, के. सी वेणुगोपाळ आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत. राष्ट्रवादीला राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. आज सकाळी शरद पवार यांची सोनिया गांधी यांच्यासोबत फोनवरुन चर्चा झाली असल्याची माहिती के. सी वेणुगोपाळ यांनी दिली.

दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनी सत्ता स्थापनेसंबंधी महत्वपूर्ण विधान केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणूकपूर्व आघाडी झाली होती. आमची राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर चर्चा सुरु आहे. आम्ही अंतिम निर्णय एकमताने घेऊ. राष्ट्रवादी बरोबर चर्चा झाल्यानंतरच पुढची भूमिका जाहीर करु असे मल्लिकार्जून खर्गे म्हणाले.

सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद असल्याचं उघड झालं असतानाच, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी फोनवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी आज सकाळी चर्चा केली. पुढील चर्चेसाठी सोनिया गांधी यांनी अहमद पटेल, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि माझी नेमणूक केली आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाळ यांनी दिली. आता हे तिघेही मुंबईला रवाना होणार आहेत. ते शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळं राज्यातील सत्तापेच सुटणार का? याबाबत उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x