16 April 2024 11:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 17 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
x

पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती; अनेक दिग्गज्जांनी श्रद्धांजली वाहिली

Pandit Jawaharlal Nehru. Sonia Gandhi

नवी दिल्ली: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांनी नेहरूंना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुरुवारी (१४ नोव्हेंबर) शांतीवनला भेट देऊन आदरांजली वाहिली आहे. नेहरू यांची जयंती बलिदान म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

१९२९ मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली. १९४१ मध्ये महात्मा गांधींचे उत्तराधिकारी म्हणून जवाहरलाल नेहरू (Prime Minister of India Pandit Jawaharlal Nehru) यांची घोषणा झाली. नेहरूंच्या फॅशनची अनेकदा चर्चा झाली. नेहरूंचं बंद कॉलरवालं जॅकेट आजपण लोक पसंत करतात.पंडीत नेहरू हे एक चांगले नेते, वक्ते यासोबत लेखकदेखील होते. नेहरूंनी लिहिलेली पुस्तके नक्कीच वाचायला हवीत.

१८५६ रोजी इंग्लंडमध्ये जगात पहिल्यांदा चेल्सी इथे बालदिन साजरा करण्यात आला होता. तिथल्या चर्चमध्ये लहान मुलांसाठी एक खास दिवस ठेवला जातो. या दिवशी लहान मुलांसाठी खास गोष्टी, गाणी, खेळ गप्पा ठेवल्या जातात. त्यानंतर हळूहळू सर्व देशांमध्ये वर्षातील एक दिवस बालदिन म्हणून त्यांच्या सोईनुसार साजरा करण्यास सुरुवात झाली.१९५० रोजी वुमेंस इंटरनॅशनल फेरडेशननं १ जून रोजी बालदिन साजरा करण्यावर बंदी आणली. १ जून हा दिवस सोडून कोणत्याही दिवशी बालदिन साजरा करण्यास हरकत नसल्याचं सांगितलं गेलं. त्याचं कारण होतं १ जून हा दिवस Children’s protection day म्हणून साजरा केला जात होता. त्यानंतर १९५४ रोजी संयुक्त राष्ट्राने मुलांचे अधिकार आणि हक्क लक्षात घेऊन २० नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून घोषित केला. आता सर्व देशांमध्ये २० नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. १९५४ ते १९६४ रोजी भारतातही २० नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जात होता.

१९६४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर मात्र भारतातील बालदिनाची तारीख बदलण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली म्हणून १४ नोव्हेंबर म्हणजेच त्यांचा जन्मदिन हा बालदिन म्हणून भारतात साजरा करण्यात येतो. २७ मे १९६४ रोजी याबाबत भारतात सर्वानुमते अधिकृत घोषणा करण्यात आली.

२० व्या शतकातील महान नेते विस्टन चर्चिल, फ्रान्सचे राष्ट्रपती चार्ल्स डी गॉल, रशियाचे जोसेफ स्टालिन, लोकप्रीय राष्ट्रपती जॉन एफ केनेडी, चीनचे हुकूमशहा माओत्से तुंग यांच्या तुलनेत बौद्धिक पातळीवर नेहरू नेहमीच श्रेष्ठ आहेत. त्यांचे इतिहासाचे ज्ञान आणि मानवतावादी प्रतिमा यांच्यापेक्षा मोठी आहे. नेहरू जरी देशाचे पंतप्रधान होते, तरीही त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच होते. १९५१ साली राष्ट्रसंघाच्या परिषदेत त्यांनी दिलेल्या एका भाषणावरुन त्याचा प्रत्यय येतो.

मी केवळ पंतप्रधान नाही, तर त्यापेक्षा अधिक आहे, मी माणूस आहे, कायम स्वतःत सुधारणा करण्यासाठी स्वतःशीच संघर्ष करत असतो, माणसांन कसं असायला हवं, याचाच विचार मी नेहमी करतो, यातून नेहरुंमधला माणुस आपल्याला पाहायला मिळतो

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x