29 March 2024 3:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

VIDEO - ते पुन्हा आले, पण बाळासाहेबांच्या चरणी; शिवसैनिकांची घोषणाबाजी

Devendra Fadnavis, Shivtirth, Shivaji Park, Balasaheb Thackeray

मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. यावेळी फडणवीस यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद तावडे, पंकजा मुंडे तर शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती होती. आदरांजली वाहिल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांना हात जोडत बोलण टाळलं. मात्र, परत जात असताना फडणवीसांना बघून शिवसैनिकांनी मी पुन्हा येईन अशी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन बाळासाहेबांना अभिवादन केलं होतं. त्यानंतर, दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास फडणवीस शिवतीर्थावर पोहोचले. मात्र, शिवतीर्थावरुन बाहेर पडताना, फडणवीस यांच्या गाडीला घेराव घालून शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन… अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. शिवसैनिकांनी आपल्या मनातील राग घोषणाबाजीतून व्यक्त केली.

भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच तुटल्याचे शिवसैनिक मानतात. शिवाय फडणवीस यांनीच दिलेला शब्द पाळला नाही, उलट त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला असे शिवसैनिक मानतो. या मुळेच शिनसैनिकांनी ‘मी पुन्हा येईन…. मी पुन्हा येईन…. मी पुन्हा येईन…’ अशा घोषणा देत फडणवीस यांचा निषेध केला.

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x