24 April 2024 3:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअर सहित हे 5 शेअर्स खिसे भरणार, 44 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल GTL Share Price | मालामाल करणार स्वस्त GTL शेअर! देईल 200 टक्के परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या
x

सभागृहाचं कामकाज संविधानानुसार चालत नसल्यानं भाजपचा सभात्याग: फडणवीस

Opposition leader Devendra Fadnavis, Chief Minister Devendra Fadnavis

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला आज बहुमत चाचणीच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागणार आहे. दुपारी २ च्या सुमारास विधानसभेत बहुमत ठराव मांडण्यास सुरुवात झाली आहे. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील सभागृहाचं कामकाज सांभाळत आहेत. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षाकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

एक हंगामी अध्यक्ष हटवून दुसरे अध्यक्ष बदलल्याची घटना देशाच्या इतिहासात कधी घडली नव्हती. त्यामुळे सरकारला अध्यक्ष का बदलावा लागला. संविधानाची पायमल्ली होत आहे. हंगामी अध्यक्ष झाल्यानंतर आजवर विश्वासमताचा प्रस्ताव आला नाही. तुम्हाला कसली भीती होती. गुप्त मतदान पद्धतीने मतदान झालं तर आपला विश्वास दर्शक ठराव मंजूर होणार नाही. याची भीती तुम्हाला होती. त्यामुळेच सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आले असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीच्या सदस्यांमध्ये जोरदार हंगामा झाल्याचं पहायला मिळालं. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून दादागिरी नही चलेगी अशी घोषणाबाजी केली. तसंच यावेळी मंत्र्यांचा परिचय सुद्धा योग्य नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडीवरही आक्षेप घेतला. देशाच्या इतिहासात हंगामी अध्यक्ष कधीही निवडण्यात आले नाही. हंगामी अध्यक्ष बदलण्याची गरज काय पडली असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केली. नियम, कामकाज धाब्यावर बसवून विधीमंडळाचं काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

महत्वाची सूचना: आता तुम्ही सरकारी नोकरीचा सराव महाराष्ट्रनामा न्यूज’वर ऑनलाईन करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि सुरु करा सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास.

https://www.maharashtranama.com/online-test/

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x