28 March 2024 6:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

आरोप करून अज्ञातवासात जाणारे किरीट सोमैया टीआरपी'साठी पुन्हा प्रकटले? सविस्तर वृत्त

BJP Former MP Kirit Somaiya, Chief Minister Uddhav Thackeray, Shivsena

मुंबई : राज्यातील सत्तांतर नाट्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडीने सरकार स्थापन केलं. मात्र तिळपापड झालेले भारतीय जनता पक्षाचे नेते शिवसेनेविरोधात आग ओकण्यास सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरे मेट्रो कारशेड प्रकल्पाला स्थगिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. तसेच अन्य प्रकल्पांबाबतही फेरविचार करणार असल्याचं सांगितले यावरुन भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. किरीट सोमैय्या यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय की, शिवसेनेने आपला रंग दाखवायला सुरुवात केली आहे असं म्हणत जहरी टीका केली आहे.

तत्पूर्वी म्हणजे मार्च २०१६ मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ‘ईडी’ने अटक केलं होत. परंतु भुजबळांच्या अटकेनंतर सोमैया यांनी, ‘पुढील क्रमांक अजित पवार व सुनील तटकरे यांचा’, असे वक्तव्य केले. दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा तसेच अन्य आर्थिक घोटाळ्यांच्या चौकशीसाठी छगन भुजबळ यांना ‘ईडी’कडून अटक करण्यात आलं होतं. छगन भुजबळ आणि भुजबळ कुटुंबीयांविरुद्ध ईडीने मुंबई पोलिसांच्या फिर्यादीच्या आधारे काळा पैसा बाळगल्याप्रकरणी १७ जून, २०१५ रोजी मनी लाँडरिंगचे दोन गुन्हे दाखल केले होते.

त्यांच्यावर दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या बांधकामातील भ्रष्टाचार आणि कलिना येथील जमीन हडप करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. याशिवाय छगन भुजबळ कुटुंबाच्या २८० कोटी रुपयांच्या मालमत्ताही जप्त करण्यात आल्या होत्या. छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे पुत्र पंकज भुजबळ व पुतण्या समीर भुजबळ आ​णि इतर काही संशयितांच्या नऊ ठिकाणांवर ‘ईडी’ने दोनवेळा छापे घातले होते.

छगन भुजबळ कुटुंबियांच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे राज्याच्या तिजोरीचे ८७० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचाही ‘ईडी’चे म्हणणे होते. छगन भुजबळ कुटुंबाच्या आर्थिक व्यवहाराचा तपास करणाऱ्या ‘ईडी’ला ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदी म्हणजे भुजबळ कुटुंबाला मिळालेली लाच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्र सदनच्या कंत्राटदारांना प्रकल्पाचे काम देण्याच्या बदल्यात भुजबळ कुटुंबाला रोख रक्कम मिळाली असून, ती रक्कम विविध कंपन्या आणि व्यवसायात गुंतविण्यात आली असल्याचा ‘ईडी’चा संशय होता.

त्यानंतर प्रकल्पांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन तत्कालीन मंत्री सुनील तटकरे व अजित पवार यांनी शेतकऱ्यांची लुटमार केली असून, याबाबत सक्तवसुली संचालनालयाकडे तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांची लवकरच चौकशी सुरू होणार आहे असं वक्तव्य भाजपचे खासदार किरीट सोमैया यांनी केलं होतं. त्यामुळे अजित पवार व सुनील तटकरे दोघांना पुढची दिवाळी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यासोबत आर्थररोड तुरुंगात साजरी करावी लागणार असल्याचे भाकीत खासदार किरीट सोमैया यांनी अलिबाग येथे केले होते.

किरीट सोमैया यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांना लेखी निवेदन देऊन त्यांच्याशी जवळजवळ एक तास चर्चा केली होती. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘जिल्ह्यात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराविरोधात संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली आहे. आजपासून अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात ऑपरेशनची सुरुवात झाली आहे’, असे त्यांनी पत्रकारांना सांगितल होतं.

परंतु संपूर्ण प्रकरणात वारंवार पाठपुरावा आणि पत्रकार परिषद घेऊन अनेक वक्तव्य करणारे अचानक दिसेनासे झाले होते आणि त्यांच्या प्रतिक्रिया सुध्दा ऐकू येत नाहीत असं राजकीय विश्लेषक बोलत होते. छगन भुजबळ तर तुरुंगातून बाहेर आले आणि दुसरे नेते सुद्धा बाहेरच आहेत तरी किरीट सोमैया आहेत तरी कुठे असं इतर राजकीय पक्षातील नेते विचारात होते. किरीट सोमैयांच्या अघोषित शांती मागचं नक्की कारण तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यांच्या शांती मागचं खरं कारण भाजपच्या मंत्र्यांची बाहेर आलेली तत्कालीन भ्रष्टाचाराची प्रकरणं आणि मोठ्या प्रमाणावर झालेले बँक घोटाळे, ज्यामुळे मोदी सरकारवर विरोधकांची आणि लोकांमधून झालेली टीका ही मुख्य कारण होती असं राजकीय जाणकार सांगतात. दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीट देखील नाकारण्यात आलं आणि पक्षात त्यांना अनेक मेळाव्यात जमिनीवर बसताना प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्याने टिपले आहे. त्यामुळे पुसली गेलेली ओळख पुन्हा मिळविण्यासाठी त्यांनी असले आरोप आणि खटाटोप करण्यास सुरुवात केल्याचे म्हटले जातं आहे.

हॅशटॅग्स

#KiritSomaiya(31)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x