19 April 2024 7:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

सैन्यदलावर सायबर हल्ला; जवानांना मोठ्याप्रमाणावर हायपरलिंकसोबत फिशिंग मेल

major cyber attack, Indian Army, Pakistan, China

नवी दिल्ली: पाकिस्तान-चीनने भारतीय सैन्यदलांना इतर कुरापती करून त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून थेट बी भारतीय सैन्यावर सायबर हल्ला झाल्याचं वृत्त आहे आणि भारतीय सैन्यदलाचे जवान यावेळी केंद्रस्थानी असल्याचं वृत्त आहे. कारण भारताच्या सैन्यदलावर शुक्रवारी रात्री उशिरा हॅकर्सनी मोठा सायबर हल्ला केला असून लष्कराने देखील सतर्कतेचा इशारा म्हणौन आपत्कालीन स्थिती घोषित करत जवानांनी मेल उघडताना, त्यावर नोटीस असे शिर्षक असल्यास ते अजिबात उघडू नयेत असे सक्तीचे आदेश दिले आहेत.

विशेष म्हणजे हा अलर्ट भारताच्या तिन्ही सैन्यदलांना देण्यात आला असून एचएनक्यू नोटिस फाइल.एक्सएलएस या हायपरलिंकसोबत बल्क फिशिंग मेल सैन्य दलातील जवानांना धाडण्यात येत आहेत. सदर मेल ‘[email protected]’ या ईमेल आयडीवरून पाठविण्यात येत आहेत, असे या प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे. खाजगी इनबॉक्समध्ये हा मेल आल्यास सुरक्षेचा उपाय म्हणून तो उघडून नये. अशा प्रकारच्या मेलपासून सावध रहा आणि त्याची तक्रार करा तसेच तो मेल डिलीट करावा, असे या सूचनेमध्ये कळविण्यात आलं आहे.

भारत सरकार देखील भारतीय लष्करासाठी सायबर सेक्युरिटी टीम स्थापन करण्याची योजना आखात आहे. त्याला प्रमुख कारण म्हणजे पाकिस्तान आणि चीन हे दोन देख सध्या भारताच्या सैन्याविरुद्ध सायबर कुरापती करण्याच्या योजना आखून थेट भारतीय जवानांवर हनीट्रॅप लावून, महत्वाची माहिती मिळविण्याचे मार्ग अवलंबत असल्याचं यावेळी देखील अनेकदा निदर्शनास आलं आहे.

दरम्यान या सायबर हल्ल्यामागे नवीन ट्रेंड दिसत आहे. पाकिस्तानी गुप्तहेर भारतीय सैन्याच्या जवानांना त्यांच्या जाळ्यामध्ये ओढण्यासाठी दुसऱ्या देशांचा वापर करत आहेत. अनेक प्रकरणांत हे गुप्तहेर दुसऱ्या देशांचे सुरक्षा अधिकारी असल्याचे सांगून भारतीय सेनेच्या तंत्रज्ञान प्रणालीमध्ये घुसलेले आहेत, असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

 

Major Cyber Attack over Indian Army But Suspected Be From Pakistan and china

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x