28 March 2024 7:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

शॉपिंगच्या आरोपामुळे मॉरिशसच्या राष्ट्रपतीं राजीनामा सादर करतील

पोर्ट लुई/मॉरिशस : शॉपिंगच्या आरोपामुळे मॉरिशसच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीं अमीना गुरीब फकीम यांना त्यांच पद सोडावं लागणार आहे. पुढच्या आठवड्यात अमीना गुरीब फकीम आपला राजीनामा सादर करतील.

अमीना गुरीब फकीम या मॉरिशसच्या पहिल्या राष्ट्रपती होत्या आणि त्यांनी शॉपिंगसाठी एका स्वयंसेवी संस्थेचं क्रेडिट कार्ड वापरून शॉपिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या आरोपांमुळेच अमीना गुरीब फकीम यांना राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनॉथ यांनी दिली आहे.

अमीना गुरीब फकीम या केमिस्ट्रीच्या प्राध्यापक होत्या आणि २०१५ मध्ये त्यांना मॉरिशसच्या पहिल्या राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता. परंतु लवकरच त्यांना शॉपिंग साठी एका स्वयंसेवी संस्थेचं क्रेडिट कार्ड वापरल्याने पदाचा राजीनामा देण्याची वेळ आली आहे. मॉरिशस मधील वृत्तपत्रांनी केलेल्या दाव्यानुसार त्या जेव्हा दुबई आणि इटलीच्या दौऱ्यावर होत्या त्यावेळी लाखो रुपयांची शॉपिंग केली होती. ती सर्व शॉपिंग ड्युटी फ्री होती आणि त्या शॉपिंगचे पेमेंट करण्यासाठी त्यांनी प्लॅनेट अर्थ इन्स्टिटयूट या स्वयंसेवी संस्थेचं क्रेडिट कार्ड वापरल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. परंतु अमीना गुरीब फकीम यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

हॅशटॅग्स

#Ameenah Gurib Fakim(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x