29 March 2024 2:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार?
x

स्मृती इराणींच्या कमी शिक्षणाचे मूळ कारण म्हणजे?....काँग्रेसकडून बोचरी टीका

Union Minister Smriti Irani, Congress Leader Sachin Sawant

मुंबई: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘रेप इन इंडिया’ या वक्तव्यावरून शुक्रवारी लोकसभेत गदारोळ पहायला मिळाला. स्मृती इराणी यांच्यासोबत भाजपाच्या महिला खासदारांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली.

राहुल गांधी यांनी अशाप्रकारचं वक्तव्य करून देशातील समस्त महिलांचा अपमान केला असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. राहुल गांधी यांचं हे वक्तव्य नींदनीय आहे आणि त्यांना याबाबत शिक्षा झाली पाहिजे, असंही त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांनी गुरूवारी झारखंडमध्ये एका रॅलीला संबोधित केलं होतं. त्यावेळी बोलताना ‘मेक इन इंडिया’ आता ‘रेप इन इंडिया’ झाल्याचं ते म्हणाले होते.

मागील शुक्रवारीही महिला मुद्द्यावरुन लोकसभेत गोंधळ झाला होता. त्यावेळी काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं होतं की, एकीकडे देशात रामाचं मंदिर बनविले जातंय तर दुसरीकडे सीतामातेला जाळण्याचं काम होतंय. उन्नाव आणि हैदराबाद बलात्काराच्या घटनेवर त्यांनी महिला सुरक्षेचा मुद्दा लोकसभेत उचलला होता. तर काँग्रेसने महिला सन्मानाचा विषय धर्माशी जोडणं चुकीचं आहे. यापूर्वी मी असं कधी पाहिले नाही. ज्यांनी बलात्काराचा राजकीय फायद्यासाठी वापर केला ते भाषण देतायेत. उन्नाव असेल वा तेलंगणा ज्या घटना घडल्या ते दुर्दैवी आहेत. दोषींनी फाशी मिळायला हवी पण त्यावर राजकारण करु नका असं त्यांनी सांगितलं होतं.

मात्र त्यावर राहुल गांधी यांनी सांगितलं की, “माझ्या मोबाइलमध्ये एक व्हिडीओ क्लिप आहे ज्यामध्ये नरेंद्र मोदी दिल्लीला रेप कॅपिटल म्हणत आहेत. हा व्हिडीओ मी ट्विट करणार आहे जेणेकरुन सर्वांना पाहता येईल. भाजपा, नरेंद्र मोदी आणि अमित शाह ईशान्य भारत जाळत आहेत. त्या मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठीच नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष माझ्यावर आरोप करत आहेत”. दरम्यान सांगितल्याप्रमणे राहुल गांधी यांनी मोदींच्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याने मोदींसहित संपूर्ण भारतीय जनता पक्षचं तोंडघशी पडला आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यांच्या शिक्षावरूनच टीका करण्याचं मूळ कारण म्हणजे, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं शिक्षण, त्यांची पदवी नेहमीच वादात आणि चर्चेचा विषय राहिली. ५ वर्षांपूर्वी इराणी यांनी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हा इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून गदारोळ निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आपण परदेशातील येल विद्यापठातून ग्रॅज्युएट असल्याचं स्मृती यांनी अनेकवेळा जाहीरपणे सांगितलं होतं. परंतु आता लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी वेगळीच माहिती दिली आहे. आपण ग्रॅज्युएशन पूर्ण न केल्याचं त्यांनी शपथपत्रात नमूद करत स्वतःच्या पदवीचा वाद कायमचा संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.

आपण दिल्ली विद्यापीठाच्या मुक्त शिक्षण विभागातून बीकॉमची प्रथम वर्षाची परीक्षा दिली. परंतु, ३ वर्षांचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंच नाही, अशी माहिती इराणी यांनी शपथपत्रातून नमूद केली आहे. पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण न केल्याची माहिती खुद्द इराणी यांनी दिल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे. इराणी यांनी २००४ आणि २०१४ मध्ये निवडणूक अर्ज दाखल करताना वेगवेगळी माहिती दिली होती. त्यामुळे त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री झाल्यानंतर त्यांच्यावर शिक्षणावर टीका झाली होती.

२००४ मध्ये इराणी यांनी चांदणीचौक मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळो आपण बीए’पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्याची माहिती त्यांनी शपथपत्रात दिली होती. दिल्ली विद्यापीठाच्या मुक्त शिक्षण विभागातून आपण बीए केल्याचं त्यांनी शपथपत्रात नमूद केलं होतं. पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं.

 

Web Title:  Congress Spokesperson Sachin Sawant slams Smriti Irani Over Targeting MP Rahul Gandhi

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x