29 March 2024 7:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर; ट्रम्प यांना झटका

US Congress, US House, US President Donald Trump

वॉशिंग्टन: सत्तेचा दुरुपयोग केल्याच्या आरोपावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात कनिष्ठ सभागृह असलेले हाउस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह मध्ये झालेल्या ऐतिहासिक मतदानाद्वारे महाभियोग प्रस्ताव मंजूर झाला. आता ट्रम्प यांना सत्तेवरून हटवण्यासाठी उच्च सभागृह असलेल्या सेनेटमध्ये महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आता सीनेटमध्ये हा प्रस्ताव नेण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यातच सीनेटमध्ये यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु सीनेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचं बहुमत आहे. त्यामुळे या सभागृहात हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

डेमोक्रेट्स नेते नॅन्सी पेलोसी यांच्या मते, ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संविधानाचा घोर अपमान केला आहे. कोणीही कायद्याहून श्रेष्ठ नसल्याचंही नॅन्सी म्हणाल्या होत्या. ट्रम्प यांनी यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी सैन्य कारवाईची धमकी दिली होती. तसेच त्यांनी दबाव टाकत माजी उपराष्ट्राध्यक्ष बाइडन आणि त्यांचा मुलगा हंटर याच्याविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना आदेश दिले होते. परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

 

Web Title:  Big shock to US President Donald Trump majority of US House votes to impeach President Trump for abuse of power.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x