28 March 2024 4:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या
x

स्वखर्चातून १ लाख २० हजारात मोदींचं मंदिर; अन घरी गॅस जोडणी व शौचालय सरकारी योजनेतून

Modi Temple

चेन्नई: तामिळनाडूच्या त्रिचीमधील भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असणाऱ्या पी. शंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील प्रेमापोटी आपण हे मंदिर बांधल्याचे म्हटलं आहे. येथील इराकुडी गावामध्ये हे छोट्या आकाराचे मंदिर बांधण्यात आलं आहे. हे मंदिर आता पंचक्रोषीमध्ये ‘नमो मंदिर’ नावाने लोकप्रिय झालं आहे. आजूबाजूच्या गावांमधून अनेकजण या मंदिरामध्ये असणाऱ्या मोदींच्या मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या “लोकसभा निवडणुकीआधीच या मंदिराचे काम सुरु झाले होते. मोदींनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं असं मला वाटतं होतं. त्यासाठीच मी हे मंदिर बांधण्याचं ठरवलं,” असं शंकर सांगतात. शंकर हे गावातील शेतकरी गटाचे अध्यक्ष आहेत. तामिळनाडूमधील इराकुडी गावामध्ये ‘नमो मंदीर’ या नावाने नरेंद्र मोदी यांचे मंदिर प्रसिद्ध आहे. तसेच आजूबाजूच्या गावामधील लोकं देखील आता पी. शंकर यांनी बांधलेल्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येतात.

मी या मंदिरामध्ये पुजा करण्यासाठी एक पुजारी ठेवण्याचा विचार करत आहे. मात्र त्यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद होईपर्यंत मी स्वत: पुजा करत असल्याचे पी. शंकर यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या योजनांतर्गत मला २००० रुपये, गॅस जोडणी व शौचालय देखील बांधून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

या मंदिराता मोदींशिवाय या मंदिरात महात्मा गांधी, स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेसचे नेते के. कामराज, एआयएडीएमकेचे नेते एमजी रामचंद्रन आणि जे. जयललीता, गृहमंत्री अमित शहा, तामिळनाडूनचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांचे फोटो लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे स्वतःच्या घरातील लहानसहान सोयी सुद्धा सरकारी योजनेतून घेणाऱ्या या अजब मोदी भक्ताने मोदींसाठी लाखातील मंदिर मात्र स्वखर्चातून उभारलं आहे. त्यात ढीगभर विद्यमान राजकारण्यांना मंदिरात जागा दिली असली तरी त्यात स्वतःच्या जन्मदात्या माता-पित्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही हे विशेष म्हणावे लागेल.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x